1 min read

विजय पवार यांची प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती

Loading

विजय पवार यांची प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती

जळगाव -जिल्हा परिषद जळगाव च्या प्राथमिक शिक्षण विभागातील जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांना उपशिक्षणाधिकारी पदाच्या रिक्त असलेल्या जागेचा पदभार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेने व मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) यांच्या आदेशानुसार देण्यात आला आहे.श्री विजय पवार यांनी यापूर्वी मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कामकाज केले होते. तसेच कोरोना काळातही त्यांनी उपशिक्षणाधिकारी पदाचा पदभार सांभाळला होता.त्यांनी गुणवत्ता विकासासाठी जि प शाळा मुसळी ही शाळा दत्तक घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *