1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे प्रज्ञासूर्यास अभिवादन !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे प्रज्ञासूर्यास अभिवादन !…

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थतज्ञ, विचारवंत, बोधिसत्व, महामानव, परमपूज्य, कायदेपंडित, सत्यशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच.डी.माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्ही.टी. माळी यांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक सामाजिक कार्य विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पी.डी.पाटील यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *