बोर्ड ऑफ स्टडीज गणित सायन्स व तांत्रिक विद्या शाखेवर सदस्यपदी डॉ वासुदेव पाटील यांची निवड
![]()

बोर्ड ऑफ स्टडीज गणित सायन्स व तांत्रिक विद्या शाखेवर सदस्यपदी डॉ वासुदेव पाटील यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- आर्ट सायन्स आणि कॉमर्स कॉलेज चिखलदरा जिल्हा अमरावती येथील प्राध्यापक डॉ वासुदेव पाटील यांची बोर्ड ऑफ स्टडीज गणित सायन्स व तांत्रिक विद्या शाखेवर पाच वर्षासाठी सदस्य पदी निवड झाली.
डॉ वासुदेव पाटील हे आर्ट सायन्स आणि कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य म्हणून पाच वर्षे त्यांनी व्यवस्थित धुरा सांभाळली त्यांच्या कामाची दखल विद्यापीठाने घेत त्यांची पाच वर्षासाठी विद्याशाखेवर सदस्य पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आर्ट सायन्स आणि कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य व माजी कुलगुरू संत गाडगेबाबा विद्यापीठाचे डॉ राजेश जयपूरकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
डॉ वासुदेव पाटील हे कळमसरे तालुका अमळनेर येथील असून त्यांचे अभिनंदन सर्व समाज बांधव व गावातील नागरिकांनी अभिनंदन केले.


