1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे महात्मा फुले जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

अमळनेर प्रतिनिधी-आज दि.११/०४/२०२३ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे साजरी करण्यात आली.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आले.तर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनिष जाधव सर यांनी दिली. सूत्रसंचालन श्री.जगदीश सोनवणे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. हेमंत महाजन सर यांनी केले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *