हनुमान जन्मोत्सवनिमित्त पाडळसरे येथे काल्याचे कीर्तन
![]()

हनुमान जन्मोत्सवनिमित्त पाडळसरे येथे काल्याचे कीर्तन
दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटप करून चैत्रोत्सवाची सांगता
गौरवकुमार पाटील | पाडळसरे
येथील ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सवात हनुमान जयंती व राम नवमीचे निमित्त साधून संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांकडून सालाबादप्रमाणे आयोजित हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात काल्याचा किर्तनाने दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटून सांगता झाली
चैत्रोत्सवात राम नवमी व हनुमान जन्मोत्सव सालाबादप्रमाणे ग्रामवासी व संत तुकाराम महाराज भजनी मंडळाकडून साजरा करण्यात आला यात चैत्र शुद्ध अष्टमीला पूजाविधी करून आळंदी येथील नामवंत कीर्तनकार यांनी हजेरी लावत हरिनाम कीर्तन व श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले होते त्यात चैत्र चावादस निमित्त खीर व पुरणपोळीची आरतीचा भोग ग्रामवासीयांकडून दाखवून दुपारी पंच मंडळातील हभप मूलचंद पाटील ,छगन पाटील ,शांताराम पाटील , युवराज पाटील ,पत्रकार वसंतराव पाटील ,मधुकर गुर्जर ,जयराम पाटील यांच्याहस्ते ध्वज पूजन करून कुलस्वामिनी अंबिका माता व शिरागड वासिनी सप्तश्रृंगी मातेच्या नावे दोन भगवे ध्वज जोगवा भारुड ,देवीचा महिमा गाऊन नाचत , वाजत गाजत लावण्यात आल्या ,काल्याचा दिवशी हनुमान जयंती निमित्त श्रीहनुमान मूर्तीचे पांच नद्यांच्या पाण्याने पंचामृत स्नान घालून हभप ताराचंद पाटील व चंद्रशेखर पाटील यांनी सपत्नीक अभिषेक करून हभप उमेश पाटील ,हभप गोकुळ पाटील ,हभप आबासाहेब पाटील ,मुरलीधर पाटील ,प्रल्हाद पाटील यांच्या समूहाकडून सुंदरकांड व देवी महिमा गाण्यात आला ,पहाटे पाच वाजेपासून महिला मंडळाने महाप्रसादासाठी गोवरीवर दाल बट्टी शेकून देवीचा जागर करीत महाप्रसाद तयार केला तर सकाळी ८ ते १० यावेळात हभप भावेश महाराज विटनेरकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे मानकरी हभप रघुनाथ देवचंद पाटील यांच्याकडून शिरा व दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून लाही काला व महाप्रसाद वाटून चैत्रोत्सवाची देवीची ओटी भरून देवीआरतीसह भागवत आरती करून सांगता झाली,चैत्रोत्सवात राम नवमी व हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत तुकाराम महाराज भजनी मंडळ , जय शिवसरदार ग्रुप व महर्षी वाल्मिकी सह एकलव्य मित्र मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले

