मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी वर्ल्ड पार्लमेंटचे अनोखे साहित्यीक उपक्रम !
![]()

मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी वर्ल्ड पार्लमेंटचे अनोखे साहित्यीक उपक्रम !
श्रीरामपूर : –
मराठी भाषेला स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही राजभाषेचा अभिजात दर्जा मिळालेला नाही. तो मिळण्याच्या पवित्र विचाराने झपाटलेल्या वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या संकल्पनेतून अनेक उदबोधक संकल्पना साकारल्या जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणजे सर्वांच्या जीव्हाळ्याचा विषय असलेल्या
“आई ” या विषयावर मराठी भाषेतील
” महामाय ” या जगातल्या सर्वात मोठ्या सामुहिक काव्यखंड निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर असून यामध्ये विश्वविक्रमी संख्येने मराठी भाषिक कवी / कवयत्री सहभागी होत आहेत.
वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने सातत्याने साहित्यीकांसाठी काव्य संमेलने, कथाकथन, साहित्य संमेलनांचे आयोजित केले जात असून त्यासाठी जगभरातील अनेक नामवंत मराठी साहित्यीक ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने सहभाग नोंदवत आहे.
मागील दोन वर्षांपासून ‘आई ‘ या विषयावरील आंतरराष्ट्रीय दर्जाची काव्यलेखन स्पर्धा आयोजीत करून डब्ल्ल्यूसीपीएने जगभरातील मराठी साहित्यीकांसाठी स्पर्धात्मक व्यासपिठही उपलब्ध करून दिले आहे. शिवाय गुणवान विजेत्या साहित्यीकांना डब्ल्ल्यूसीपीएचे लाईफ टाईम सदस्यत्वही बहाल करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे डब्ल्ल्यूसीपीए यासाठी कुठल्याही प्रकारची फी अथवा शुल्क आकारत नाही.
आता तर ” बाप ” या उपेक्षित व्यक्तिमत्वालाही कवितेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यासपिठ मिळवून देण्यात डब्ल्ल्यूसीपीए अग्रक्रमाने पुढे सरसावले असून ” बाप ” या विषयावरची आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धा सुरू केली असून त्यासाठी संबंधीतांनी आपले स्वरचीत एक मराठी काव्य टाईप करून, आपल्या पूर्ण नाव व पत्त्यासह ९०९६३७२०८२ या व्हॉटसप क्रमाकांवर पाठवायचे आहे. यातील विजेत्यांना “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पोएट्री अवॉर्ड २०२३”
देऊन सन्मानित करण्यात येईल.
तसेच येत्या १७ मे २०२३ रोजी श्रीरामपूर येथे एका रंगारंग कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येईल. तरी आतापर्यंत आपला सहभाग घेऊ न शकलेल्या कवी / कवयत्रींनी आपल्या स्वरचित काव्यरचना कोणताही विलंब न करता तातडीने पाठवाव्या. तसेच सदरचे निवेदन इतर वंचित कवी / कवयत्रीं पर्यंत पोहोचावे.
असे आवाहन डब्ल्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.

