महात्मा फुले जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर व्हावी
[ सत्यशोधक समाज संघ व विविध समविचारी संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी ]
![]()

महात्मा फुले जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर व्हावी
[ सत्यशोधक समाज संघ व विविध समविचारी संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी ]
महात्मा फुले जयंतीला ११ एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या नेतृत्वाने समविचारी संघटनांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याद्वारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले .जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी अमित मित्तल यांना सुट्टी संदर्भात निवेदन सत्यशोधक समाज संघाचे राज्य उपाध्यक्ष सुधाकर बडगुजर तसेच महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, सत्यशोधक साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल , अखिल भारतीय सत्यशोधक समाज जिल्हाध्यक्ष जयसिंग वाघ व जिल्हा सत्यशोधक समाज संघ जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांच्या हस्ते बुधवार दि.५ एप्रिल २०२३ रोजी देण्यात आले.
महात्मा गांधी यांनी सुद्धा महात्मा म्हणून ज्योतिराव फुले यांचा सन्मान केला . फुले आधुनिक भारताचे निर्माते असून पुरोगामी महाराष्ट्राचा पाया त्यांनी भक्कम केला .स्वातंत्र्य, समता ,मित्रता व न्याय मुल्ये भारतातच नव्हे तर विश्वात रुजविण्यासाठी जीवाची बाजी लावली आणि निर्भीड सत्य प्रस्थापित केले. छत्रपती तथा कुळवाडीभूषण शिवरायांची समाधी प्रथमतः शोधून जगासमोर आणली ! शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्यकर्तृत्वाबाबत मराठी भाषेत पहिला पोवाडा लिहिला ! समस्त शूद्रादिशूद्र व स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले . नविन पिढ्यांना फुले यांच्या ऐतिहासिक अतुलनीय कार्याची उंची कळावी आणि फुल्यांच्या चरित्राच्या अभ्यासाचे कुतुहल निर्माण व्हावे . अशा थोर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुटी जाहिर करून फुले यांच्या कार्याचा गौरव करावा . सुटीमुळे प्रशासकीय पातळीवर सिमित होणारे प्रबोधन प्रबोधनकारांना सामान्य जनतेला विविध कार्यक्रमांनी सुटी मिळाल्याने व्यापकपणे करता येईल . परिणामी महात्मा फुले यांच्या उत्तुंग व अतुलनीय कालातीत शैक्षणिक ,सामाजिक व सांस्कृतीक कार्यामुळे जन सामान्यांच्या जगण्याला दिशा मिळून त्यांना नवचैतन्य मिळेल . सर्वार्थान बहुजन समाजाचे जीवन प्रगत होईल . असे आवाहन निवेदना प्रसंगी जिल्हाधिकारी मित्तल यांना कार्यकर्त्यांनी केले.
तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले जयंतीला शासकीय सुटी जाहीर करण्या संदर्भात दिलेल्या निवेदनावर सुट्टीच्या समर्थनार्थ मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते राजेश पाटील, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा युवा जिल्हाध्यक्ष साहेबराव वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तायडे , जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघ जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे, जळगाव तालुका सरचिटणीस अरुण वांद्रे ,भारतीय मानवाधिकार जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप सुरवाडकर , सामाजिक कार्यकर्ते राहुल भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

