सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती (११ एप्रिल) शासकीय सुट्टी जाहीर करा
![]()
सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती (११ एप्रिल) शासकीय सुट्टी जाहीर करा
ओबीसी शिक्षक असोसिएशनची मागणी..

अमळनेर प्रतिनिधी
आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांना मानण्यात येते. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हि मुल्ये भारतातच नाही तर विश्वात रुजविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. महात्मा फुले यांनी सत्य प्रस्थापित करण्यासाठी जिवाची बाजी लावली तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,विरोधी पक्षनेते अजित पवार ,महात्मा फुले समता परिषदचे अध्यक्ष व माजी मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी 11 एप्रिल महात्मा फुले जयंती निमित्ताने शासकीय सुटी घोषित करावी व तसा अध्यादेश काढावा अशी मागणी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील, जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केली आहे.
सविस्तर माहिती अशी कि मराठी भाषेत पाहिलं पवाड्यारुपी शिवचरित्र लिहिण्याचा, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची लपविलेली समाधी शोधण्याचा व शिवजयंती सुरु करण्याचा मान तात्यासाहेब महात्मा फुले यांनाच जातो कारण शिवाजी महाराजांना महात्मा फुले यांनी आदर्श अर्थात गुरु मानले.
समस्त शुद्र-अतिशूद्रांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या महात्मा फुलेंना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरुस्थानी मानून महात्मा फुलेंचे अपूर्ण कार्य भारतीय संविधान लिहून पूर्णत्वास नेले.
महात्मा फुलेंचे गुरु शिवाजी महाराज व महात्मा फुले यांना गुरु मानणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शासकीय सुट्टी मंजूर आहे परंतु महात्मा फुलेंच्या जयंतीला शासकीय सुट्टी नाही हा महात्मा फुलेंचा अपमान नाही का ? तरी आपणांस विनंती आहे कि, सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे निमित्ताने महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीस (११ एप्रिल) शासकीय सुट्टी जाहीर केल्याचा शासकीय आदेश काढणेबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन जिल्हा महिला अध्यक्ष वसुंधरा लांडगे शहराध्यक्ष डी एस सोनवणे तालुका अध्यक्ष सोपान भवरे सदस्य प्रभाकर विंचुरकर ,मनोहर पाटील, एन आर चौधरी,अनिल महाजन, श्रावण तेले,अमोल माळी,बापूराव पाटील, दिपक पवार,
सल्लागार दशरथ लांडगे,अजय भामरे,
सौ भारती चव्हाण यांनी मागणी केली आहे.

