1 min read

मनपा शिक्षण विभागाने शाळा सोडल्याचा दाखला हस्तांतरण अनिवार्य करू नये – खाजगी शिक्षक संघटना

Loading

मनपा शिक्षण विभागाने शाळा सोडल्याचा दाखला हस्तांतरण अनिवार्य करू नये – खाजगी शिक्षक संघटना

मुंबई | प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी संख्येचा आलेख वाढवण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने 15 एप्रिल पासून ‘ मिशन ऍडमिशन ‘ मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पण मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत सुरु असलेल्या मराठी , हिंदी , इंग्रजी , उर्दू , तमिळ , तेलगू , कन्नड व गुजराती अशा आठ माध्यमाच्या पूर्व प्राथमिक , प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शेवटच्या इयत्तेमधील विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले नजीकच्या मनपा प्राथमिक , माध्यमिक शाळेमध्ये दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी लागणार्‍या निकालानंतर हस्तांतरित करणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक पालिका सहआयुक्त (शिक्षण) यांच्या आदेशाने काढण्यात आले. यासाठी मुंबई पब्लिक स्कूलच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना समन्वय साधण्याचे निर्देश आहेत. ही बाब शिक्षणाचा अधिकार कायदा (आरटीई) नुसार नियमांचे उल्लंघन करणारी आहे. शिक्षण मुक्त आणि अनिवार्य असल्याने कोणत्याही नजीकच्या खाजगी शाळांमध्ये सुध्दा प्रवेश घेऊ शकतात. विद्यार्थी किंवा पालक यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी केल्यास त्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा. जेणेकरून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी व्यवस्थापनाच्या पूर्वप्राथमिक , प्राथमिक , माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी पालकांना सोयीची होईल. यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांना महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी पत्र लिहून दाखला हस्तांतरण अनिवार्य करू नये अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *