राहूल गांधींच्या अहिंसात्मक सत्य उच्चारानें
मोदी सरकार झाले हताश…
संदिप घोरपडे,
मो.नं. ९४२२२७९७१०
(काँग्रेस निरीक्षक जळगांव ग्रामीण)
![]()


राहूल गांधींच्या अहिंसात्मक सत्य उच्चारानें
मोदी सरकार झाले हताश…
संदिप घोरपडे,
मो.नं. ९४२२२७९७१०
(काँग्रेस निरीक्षक जळगांव ग्रामीण)
जळगांव प्रतिनिधी
आज दि.०१/०४/२०२३ रोजी जळगांव ग्रामीण तालुका काँग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत जळगांव ग्रामीण काँग्रेस निरीक्षक अमळनेर येथील कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी राहुल गांधी यांच्या सांसदिय समितीने रद्द केलेला खासदारकी कशी बेकायदेशीर (न्यायालयाच्या परिघात राहून) व मुस्कटदाबी सुरू आहे याची सविस्तर मांडणी केली.या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना संदिप घोरपडे पुढे म्हणाले
की, राहूल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढून देशभरातील समाजमन ढवळून काढले व देशपातळीवर जे मुलभूत प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरे भारतीय जनता पक्षाचे
पंतप्रधान देऊ शकत नाहीत म्हणून प्रमुख प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे ‘स्टंट’ करून देशातील जनतेची दिशाभूल सुरू आहे. संसदेत ७ फेब्रुवारी रोजी अदानी समुहाच्या घोटाळ्याशी संबंधीत चौकशीची मागणी /
अदानी-मोदी संबंध काय?ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेशात अदनीचा मोदींसोबतचा प्रवास व टेंडर अदानीला मिळावे असा पंतप्रधानांचा दबाव याचा पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू द्यायचे नाही असे ठरवून त्यांच्या जुन्या वक्तव्याचा विपर्यास करून’न्यायव्यवस्थेचा’ गुजरात पॅटर्न वापरून राहूलजींचे सभासदत्व रद्द करून तसेच काँग्रेस
अध्यक्ष खरगे व राहूलजींचे वक्तव्य लोकसभेच्या अधिवेशन काळातील कामकाजातून वगळून लोकशाहीचा गळा घोटला (२४ तासात सभासदत्व रद्द )
प्रश्न : युवा वर्ग मोदींना फॉलो करतात
उत्तर : हो मोदींनी २०१४ ला दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मीचे स्वप्नाने युवा वर्गाला आकर्षित केले होते. परंतु रोजगार निर्मीतीचे आश्वासनपुर्ती न करता याउलट सरकारी
उद्योगक्षेत्र खाजगी उद्योजकांच्या घशात घालून इतरांचा रोजगार हिरावून एक प्रकारे जाणीवपूर्वकअव्यवस्था निर्माण करून लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे प्रवास सुरू आहे.
सोबतच शेतीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांना डबघाईस आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कृषि
कायदे करतांना फक्त व्यापारी, भांडवलदार डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखली. शेतकऱ्यांना वर्षभर
आंदोलने करून ९४५ हुतात्मे देऊन तीन काळे कायदे रद्द करावे लागले. त्याच पध्दतीने अतिशय
सुत्रबध्दपणे भारत देशाची काँग्रेसने केलेली जडणघडण विस्कळीत करण्यासाठी कामगार कायद्यात बदल
करून भांडवलदार निश्चित केले व कामगार चळवळीचे हातपाय बांधले.
प्रश्न : भाजपा सरकार नवी शिक्षण पध्दती अवलंब करून विकासाच्या दिशेने झेप घेत आहेत.
काँग्रेसने धोरण निश्चिती अंतर्गत शिक्षणपध्दती लागू केली त्यात दर दहा वर्षात संयुक्तीक बदलांना वाव
ठेवला. परिणामी यंत्रणेला प्रश्न विचारता येऊ लागले ही लोकशाहीची पायाभरणी यांना नको आहे, यांना
हवी मनुस्मृतीची ‘चातुर्वण्य व्यवस्था’ ती नविन शैक्षणिक धोरणात यथायोग्यरित्या बसवता आली.
गरीब श्रीमंतांची विद्यापीठे व गरीबांची गळचेपी यातून पुढे येईल व श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणार,
अत्यंत गरीब होत जाऊन ही दरी वाढती ठेवणे हेच नविन शैक्षणिक धोरणाचे काम.
प्रश्न :राहूल गांधी या बाबत पुढे काय करू शकतात.
उत्तर :
२०१४ पुर्वी यांनी केलेल्या कल्पना तसेच “निवडणूक जुमले” लोकांसमोर मांडत राहतील. सांसदिय प्रणालिला एकाधिकारशाही मध्ये बदलविले जात असून लोकशाहीच्या नावाने हुकूमशाही लादली जात आहे. ती सर्व सामान्यांच्या आकलनापलीकडची आहे, ती जनता दरबारात मांडणार.
सत्तेवर बसून फक्त “हम-दो हमारे दो” अर्थात मोदी-अदानी ‘अंबानी’ यांच्या लहरी प्रमाणे राज्यकारभार चालविला जात असून विरोधकांना गप्प बसविणेसाठी अनेक अनैतिक मार्गाचा अवलंब केला जात आहे.
स्वायत्त संस्थांचा वापर सरकारी दबावात करून फक्त विरोधकांची अडवणूक केली जात आहे.
अविचाराने केलेली नोटबंदी / वाढती महागाई / धार्मिक विद्वेष / भडकाऊ भाषणे/जाती-जातीत धर्मा-
धर्मात निर्माण केली जाणारी दरी यातून जनतेचे होणारे नुकसान जनतेपर्यंत पोहचवतील असे मला वाटते आणि या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने राहुलजींचे सभासदत्व रद्द केले पण यातूनच काँग्रेस पक्ष अनेक
राहुल निर्माण करून जनतेसाठी लढत राहील.

