1 min read

वाढदिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना दिले मिष्ठांन भोजन…

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.३१/०३/२०२३ चि.कार्तिक आकाश महाजन याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. चि. कार्तिक आकाश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने आजोबा श्री श्रावण माधवराव महाजन सर,नि.कला शिक्षक सानेगुरुजी विद्यालय अमळनेर यांचे कडून सर्व विशेष विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला श्री आकाश श्रावण महाजन (इंजिनियर) श्री मेघराज शामराव महाजन (पोलीस हेड कॉन्स्टेबल) श्री शांताराम शामराव महाजन (सहा. पोलीस निरीक्षक नाशिक), सौ अनिताबाई श्रावण महाजन (आजी)सौ ऐश्वर्या आकाश महाजन (आई) सौ कीर्ती शांताराम महाजन चि.कृष्णा शांताराम महाजन उपस्थित होते. श्री आकाश श्रावण महाजन यांनी रुपये ५००१/- देणगी जाहीर केली. उपस्थित परिवार यांचा स्वागत सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासो योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *