1 min read

संस्कृतचे ज्ञान आयुर्वेद आणि त्याचे मूळ समजण्यास मदत करेल: डॉ. हेमकांत बाविस्कर

Loading

संस्कृतचे ज्ञान आयुर्वेद आणि त्याचे मूळ समजण्यास मदत करेल: डॉ.श्री. हेमकांत बाविस्कर

राष्ट्रीय आयुर्वेद गुरु नेत्रचिकित्सा चा सन्मान प्राप्त करणारे तसेच जलगांव ला देश पातळीवर बहुमान मिळवून देणारे डाॅ. श्री. हेमकांत बाविस्कर यांची नुकतीच या राष्ट्रीय आयुर्वेद गुरु नेत्रचिकित्सा या पदावर केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. ही बाब जळगांव च्या सर्व नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे. हेच औचित्य साधून संस्कृत प्रचारिणी सभा जळगांव तर्फे डाॅ. हेमकांत बाविस्कर यांचा सन्मानपत्र सह यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डाॅ. बाविस्कर यांनी सांगितले की , आपला भारतदेश हा वसुधैव सकुटुम्बकम् हे ध्येय समोर ठेवूनच विश्वगुरू या पदाकडे वाटचाल करत आहे. तसेच योगासह आयुर्वेद चिकित्सा आणि संस्कृत भाषेचे सुरुवातीपासूनचे अतूट नाते आहे. ज्याप्रमाणे आयुर्वेद हा सर्व वैद्यकीय पद्धतींचा जनक आहे, त्याचप्रमाणे जगातील सर्व भाषांना संस्कृतचा स्पर्श आहे . जनतेला जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी, संस्कृत मूळमध्ये लिहिलेल्या तत्त्वांचा अर्थ आणि संदेश व्यावहारिकदृष्ट्या समजून घेणे आवश्यक आहे.आयुर्वेद समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी आयुर्वेद आचार्य किंवा वैद्यकीय(बीएएमएस) अभ्यासक्रमात संस्कृत विषयाचाही समावेश आहे. सर्व संकल्पा समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्कृत विषय शिकणे अतिशय उत्तम व हितकारक आहे. त्यामुळे संस्कृत विषय शिकवला/शिकला पाहिजे. संस्कृत भाषेच्या ज्ञानामुळेच आयुर्वेद आणि त्याची उत्पत्ती समजण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. यामुळे आयुर्वेद वैद्यकीय पद्धती लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरेल आणि डॉक्टरांनाही रुग्णांची मनस्थिती समजून योग्य उपचार देता येतील.संस्कृत भाषा ही केवळ आयुर्वेदाची नाही तर सर्व विषयांची मूळ भाषा आहे, तिच्या मदतीने या विषयाची संकल्पना समजू शकते. या सत्कार प्रसंगी संस्कृत प्रसारिणी सभेच्या
अध्यक्ष सौ.शोभाताई पाटील, कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. अखिलेश शर्मा सचिव सौ.पल्लवी जोशी , प्रा.अर्जुन शास्त्री ,प्रा.महेंद्र शिरुडे सौ. प्राजक्ता शिरुडे , प्रा.गुरुदत्त महाजन ,श्री.श्रीश् चिपळोणकर ,सौ.हर्षदा उपासनी , श्रीमती सारिका बोरसे ,सौ. आरती पाटील, श्री अरुण पाटील सौ. सुरेखा शिवरामे, श्री.विजय शुक्ल. श्री. पंकज वराडे हेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *