1 min read

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुसऱ्या टप्प्याला उस्फुर्त प्रतिसाद

Loading

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाच्या गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुसऱ्या टप्प्याला उस्फुर्त प्रतिसाद

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवारला कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरते वाचनालयाचा दुसरा टप्पा महालखेडा, निमखेडी, इच्छापुर, चारठाणा आणि बोदवड या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यांमध्ये वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या फिरत्या वाचनालयामध्ये एमपीएससी व यूपीएससी तसेच बाल साहित्य, अध्यात्मिक, कथा, कविता, कादंबरी, संस्कारक्षम, वैचारिक ग्रंथांचाही समावेश आहे. गावामध्ये वाचक वर्ग वाढवण्यासाठी तसेच मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठी ही फिरत्या वाचनालयाची ओमिनी गाडी दर आठवड्याला किंवा सुट्टीच्या दिवशी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये फिरणार असल्याचे प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा उपक्रमशील शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी याप्रसंगी सांगितले. या वेळी असंख्य वाचक वर्ग या प्रसंगी उपस्थित होते यावेळी विविध ग्रामपंचायतच्या सन्माननीय सरपंचांना गाव गाव फिरत्या वाचनालयाच्या उपक्रमाच्या माहितीचे पत्र देण्यात आले यावेळी सर्व सन्माननीय सरपंचांचा उज्जैनकर सर यांनी गुलाब बुके देऊन सत्कार्य केला याप्रसंगी महालखेडा ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, गणेश पाटील, हेमराज पाटील, रवींद्र जाधव, स्वामी पाटील, निमखेडी येथे सरपंच सौ. शितलताई तायडे, उप सरपंच प्रमोद इंगळे, प्रमोद सोनार, डॉ.सुनील पटेल गाजरे गुरुजी, श्रीकृष्ण कोकाटे , बारसू पाटील, इच्छापुर येथे सरपंच गणेशभाऊ थेटे उपसरपंच मोहनभाऊ धात्रक वासुदेव पाटील, साहेबराव घटे , चारठाणा येथे सरपंच सूर्यकांत पाटील, मनोज पाटील, अभिमन्यू पाटील, बोदवड येथे सरपंच शालुताई कमलाकर तायडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी फाउंडेशनचे जळगाव जिल्हा सचिव गणेश कोळी सर यांनी प्रत्येक ठिकाणी प्रास्ताविक करून या उपक्रमाची माहिती दिली प्रसंगी अमीर चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *