1 min read

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात महाविकास आघाडी स्थापन करून आपआपल्या पक्षातील एकूण व्यूहरचना बाबत आज राजवड येथे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या सोबत सकारात्मक चर्चा..

Loading

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात महाविकास आघाडी स्थापन करून आपआपल्या पक्षातील एकूण व्यूहरचना बाबत आज राजवड येथे माजी आमदार आदरणिय दादासो कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली….!

त्या चर्चेअंती पुढील बैठक माजी आमदार दादासो कृषीभूषण साहेबराव पाटील, आमदार दादासो अनिल भाईदास पाटील, राष्ट्रीय काँग्रेस जळगांव जिल्हाध्यक्ष मा.दादासो प्रदीप पवार तसेच शिवसेना उ.बा.ठा गट जिल्हाध्यक्ष मा.विष्णूभाऊ भंगाळे यांच्या सोबत पुढील बैठक होवून त्याचर्चे अंती निर्णय घेवून पुढील वाटचाल ठरण्यात येईल …!

आजच्या बैठकीस तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमळनेर मा.गोकुळआबा बोरसे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर मा.सचिनदादा बाळू पाटील, माजी तालुकाध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा गट मा.विजय काशिनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस मा.संदीप घोरपडे सर, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रा.सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा गट मा.श्रीकांत अनिल पाटील, चेअरमन बाम्हणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गणेश भामरे ….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *