चला शपथ घेवूया ! जल है तो कल है बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांनी शपथ घेत पाणी बचतीचे केले आवाहन
![]()


चला शपथ घेवूया ! जल है तो कल है बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांनी शपथ घेत पाणी बचतीचे केले आवाहन
पाणी आणि त्याचा मर्यादित असलेला साठा हा जागतिक चिंतनाचा विषय आहे. या विषयावर सातत्याने जनजागृती व्हावी यासाठी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून जगभरात साजरा होत असतो.याच दिनाचे औचित्य साधून बालपण स्कूल दरवर्षी या दिवशी विविध उपक्रम राबवत असते. व वर्षभर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाणी बचतीचे काम करत असते. आज जागतिक जलदिनी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात असलेल्या रेनवाॅटर हार्वेस्टिंग युनिट समोर, हात धुण्याच्या बेसीनसमोर, शाळेच्या आवारातील वृक्षांसोबत पाणी बचतीची शपथ घेत पाणी बचतीचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी जागतिक पाणी दिनाचे संदेश देणारे फलक बनवत व पाणी बचतीचे चित्र रंगवत पाणी बचतीचा संदेश दिला. शालेय आवारात पाणी बचतीसाठी रेनवाॅटर हार्वेस्टिंग युनिट, हात धुण्याच्या पाण्याचा झाडांसाठी पुनर्वापर करून झाडे जगविण्याचा काम करत आहे. शाळेस पाणी बचतीच्या कामाबद्दल विविध पुरस्कार मिळाले आहेत.
सदर उपक्रम प्रसंगी बालपण स्कूल च्या प्रमुख सौ सोनाली मुंढे तसेच सर्व शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

