महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकर १६५ आश्रम शाळेची शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचासोबत बैठक संपन्न
![]()

महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकर १६५ आश्रम शाळेची शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचासोबत बैठक संपन्न
*ठाणे ( मनिलाल शिंपी)* :महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकर 165 आश्रम शाळेला शंभर टक्के वेतनश्रेणी मिळावी या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न करत असणारे आमचे लाडके शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आम्हाला वेळोवेळी भेट देऊन उपोषणकर्त्याच्या सर्व मागण्या विचारात घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचासोबत बैठक लावण्यात आली. तसेच आमच्या आंदोलनाची दखल घेऊन, आमच्या कामासाठी विधानभवनामध्ये सुद्धा आवाज उठवला होता या बैठकीस आमदार संतोष बांगर तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव सुमन भांगे , माजी महापौर मीनाक्षी शिंदे या उपस्थित होत्या. यावेळी संस्था चालक उपोषणकर्त्यांची कमिटी यांच्या सोबत समन्वय साधून आमच्या मागण्या जाणून विशेष परिश्रम घेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आज मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करून कॅबिनेटला घेण्याचा निर्णय केला आहे. 165 आश्रम शाळा तील सर्व शिक्षक कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी आज आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे आणि सर्व शिक्षकांना माहिती आहे हे काम आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबच करून दाखवणार हा विश्वास सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये रुजला आहे शिक्षक आमदार म्हात्रे सरांना मनापासून धन्यवाद व पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

