1 min read

भाजपाचे आजचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’! – सुषमा राजेघोरपडे

Loading

भाजपाचे आजचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’! – सुषमा राजेघोरपडे

फरारी चोर नीरव मोदी, ललित मोदी यांना चोर म्हटल्याने ओबीसी समाजाचा अपमान कसा…?

राहूल गांधी काहीही चुकीचे बोलले नाहीत. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा!

भाजपाने आज राहूल गांधी यांच्या विरोधात ओबीसी समाजाच्या आडून जे आंदोलन केले ते म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’! आहेत. भारतातून फरारी झालेला गुजरातचा रहिवासी व सध्या लंडन येथे राहत असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी ज्याला नरेंद्र मोदी ‘नीरव भाई’ म्हणाले होते त्याने ११ हजार ५०० कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा केलेला आहे. आणि ललित मोदी याने आयपीएल लीग मध्ये ४६० कोटींचा घोटाळा केलेला आहे. या दोन चोरांना राहूल गांधी यांनी चोर म्हटले तर चुकले कुठे आणि यामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाला कसा. हे आंदोलन म्हणजे भाजपाचे ओबीसी समाजाच्या आडून उलट्या बोंबा मारण्याचे आंदोलन आहे.

नीरव मोदी आणि ललित मोदी कधीपासून ओबीसी झाले. आज राजकारणात एक नवीन प्रकार सुरू झालाय कोणी सरकार विरोधात बोलले की तुम्ही देशाविरुद्ध बोलतायं, तुम्ही समाजाविरुद्ध बोलताय असे म्हणायचे आणि त्यालाचं गुन्हेगार ठरवायचे. पण जनता सर्व पाहत आहे आणि त्यांना कळतयं की कोण समाजाचा अपमान करतयं, कोण देशाच्या हिताच्या विरोधात काम करतयं.

भाजपा इतर वेळी हिंदू एकता, हिंदू राष्ट्र च्या वैगेरे गप्पा झोडतात आणि आज अंगावर आले की ओबीसी समाजाच्या आडून गलिच्छ राजकारण करत आहेत. नीरव मोदी हे ओबीसी नाहीतचं पण देशातील जनतेला हजारो कोटींचा चुना लावणे हा फक्त ओबीसी समाजाचा अपमान नसून तर त्यांच्या पैशाची लूट आहे. हे मोदी फक्त चोर नव्हेत तर दरोडेखोर आहेत.

लोकसभेतून राहूल गांधी यांचे निलंबन का झालं आहे हे नीट समजून घ्यायला हवे. मोदींना संसदेतल्या राहूल गांधींच्या अदानी विषयावरच्या पुढच्या भाषणाची भीती वाटत होती म्हणूनचं त्यांनी हे सर्व घडवून आणले आहे. हा ओबीसी समाजाचा प्रश्न नसून हा मोदी आणि अदानी यांच्या सबंधांचा प्रश्न आहे. राहूल गांधी यांच्या विरोधात हे क्षडयंत्र केले असले तरी ते लोकशाहीसाठी लढत राहणार आहेत आणि मोदींनी काहीही केले तरी ते घाबरणार नाहीत. आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्तेही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *