1 min read

ओम मित्र मंडळ स्वागत प्रवेशद्वाराचे नुतनीकरण

Loading

ओम मित्र मंडळ स्वागत प्रवेशद्वाराचे नुतनीकरण

अमळनेर कुंटे रोड पवन चौक भागातील ओम मित्र मंडळ प्रवेशव्दार १९९५ साली नगरसेवक स्व शांताराम तुकाराम ठाकूर यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आले होते. त्याची किरकोळ स्वरुपातील दुरुस्ती, रंगकाम. विद्युत दिवे. कोनशिला इत्यादी काम त्यांचे सुपुत्र श्री चेतन शांताराम ठाकूर एक्स वाॅरंट ऑफिसर (आर्मी)व सामाजीक कार्यकरते यांनी स्वयंम प्रेरणेने केले. त्यानिमित्त त्याचे उदघाटन गुढीपाडव्याचे औचित्य साधुन त्यांच्या मातोश्री श्रीमती मीराबाई शांताराम ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवेशद्वारा जवळ नागरीकांना थोडा वेळ बसता येईल या हेतूने श्री रवींद्र कविश्र्वर व श्री दिवाकर पवार यांनी बसण्यासाठी सिमेंट चे बाक भेट स्वरूपात दिले. कार्यक्रमास मंडळाचे बहुतांश सभासद परीसरातील नागरिक माता भगिनी उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री भगवंत महाले. श्री विनायक तांबट यांनी अथक परिश्रम घेतले. सुत्रसंचालन. आभार प्रदर्शन श्री प्रसाद जोशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *