विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न
मंदिराच्या बांधकामासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार
आमदार अनिल पाटील
![]()






विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न
मंदिराच्या बांधकामासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार
आमदार अनिल पाटील
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
विद्याविहार कॉलनी मध्ये महादेवाचे मंदिर होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. बऱ्याच दिवसापासून कॉलनीतील भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल मंदिरासाठी व मंदिराच्या सुशोभीकरणासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध आहे असे आमदार अनिल पाटील यांनी विद्याविहार कॉलनी येथे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
अमळनेर येथील विद्या विहार कॉलनी मधे विद्येश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा दि.22~3~2023 रोजी सकाळी 9:30 वाजता गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महामण्डलेश्वर स्वामी हंसानन्द तीर्थजी महाराज कपिलेश्वर मंदिर, अमळनेर यांच्या हस्ते करण्यात आला असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार अनिल भाईदास पाटील होते तसेच आलेल्या मान्यवरांचा सत्कार मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच रवि पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून कार्यक्रमाला कपलेश्वर महादेव मंदीराचे विश्वस्त मगन भाऊसाहेब, एल.टी.पाटील, अर्बन बँक संचालिका व खानदेश शिक्षण मंडळाचे विश्वस्त वसुंधरा दशरथ लांडगे,एल.बी.आबा पाटील, सुरभी कॉलनी , मुंदडा नगर, अशोकरत्न नगर, शिव पार्वती कॉलनी, सप्तशृंगी कॉलनी, शाहू नगर विद्या विहार कॉलनी इ.परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील यांनी मानले.

