गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनींच जागृत होऊन आग्रही राहिले पाहिजे- बालासाहेब शिंदे
![]()


गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनींच जागृत होऊन आग्रही राहिले पाहिजे; बालासाहेब शिंदे
/ प्रतिनिधी
१९८६ पेक्षा २०१९ चा ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक आणि उत्पादक यांची व्याख्या बदलणारा आहे. कायदा ग्राहकांसाठी सद्यस्थितीत तरी दिलासा देणारा वाटत आहे. भविष्यातील तांत्रिक बदल, बदलणारे धोरण, कायद्याची अंमलबजावणी यावरच या कायद्याचे महत्व ठरणार आहे. गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनींच जागृत होऊन आग्रही राहिले पाहिजे प्रसंगी तक्रारी सुध्दा दाखल केल्या पाहिजेत तरच उत्पादक आणि सेवा पुरवठादार यांना जबाबदारीचे भान राहिल असे वाटते. समाजात या कायद्याची जागृती होणे अतिशय आवश्यक आहे. असे मत ग्राहक संरक्षण परिषेदेचे अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी व्यक्त केले.
ग्राहकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या २०२३ च्या जागतिक ग्राहक हक्क दिनाची संकल्पना ‘स्वच्छ ऊर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण’ अशी आहे. त्या संकल्पनेनुसार ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्यअंतर्गत समर्पण करिअर इंन्स्टीटयुट येथे बुधवार, गुरूवार, शुक्रवारी रोजी जागतिक ग्राहक हक्क पंधरवडा जनजागृती सप्ताह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांतर्गत शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर प्रमुखअतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.एस.कणसे सचिव, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल होते. तर प्रमुखपाहुणे तथा मुख्य मार्गदर्शक म्हणून ग्राहक संरक्षण परिषेदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, समर्पण इन्स्टीटयुटचे संचालक प्रा.अविनाश प्रभूराव पाटील, प्रा.सुनिल ढगे, प्रा.पांडूरंग फड, प्रा.विकास प्रभूराव पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कार्येकर्ते व्यंकटेश शिंदे, हणमंत साळुंके उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायतचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना बालासाहेब शिंदे म्हणाले की, जागतिक ग्राहक हक्क दिन १९८३ मध्ये अस्तित्वात आला.अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या प्रेरणेतून सर्वप्रथम १५ मार्च १९८३ रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन पाळण्यात आला होता. भारतात सरकारने ग्राहक संरक्षण कायदा ९ डिसेंबर १९८६ पारित केला ज्यामध्ये काही मूलभूत ग्राहक अधिकारांची रूपरेषा दिली आहे.ती बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी समजावून सांगितली. ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक चळवळीचा पाया घातला. त्यांनी संरक्षण मिळावे, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यासाठी प्रयत्न केले. ग्राहक शिक्षण अधिकार, ऑनलाईन तक्रार निवारणासाठीचे अधिकार, माहितीचा व सुरक्षितचेचा हक्क, न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आणि निवडीचा हक्क यावर बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी माहिती देत त्याचे कश्या प्रकारे कायदेशीर संरक्षण करता येत हे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व्ही.बी.शिंदे यांनी केले.तर आभार प्रा.पांडूरंग फड यांनी मानले.

