राज्यातील शिक्षकांना, शिक्षकेत्तर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेंशन देण्यास तत्वता: मान्यता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे सरांच्या आणि संगिताताई शिंदे शिक्षण संघर्ष संघाचा प्रयत्नांना यश
![]()

राज्यातील शिक्षकांना, शिक्षेकतर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेंशन देण्यास तत्वता: मान्यता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे सरांच्या आणि संगिताताई शिंदे शिक्षण संघर्ष संघाचा प्रयत्नांना यश
मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी ) शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे सरांच्या आणि संगिताताई शिंदे शिक्षण संघर्ष संघ यांच्या प्रयत्च्नाने राज्यातील शिक्षकांना, शिक्षेकतर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेंशन देण्यास तत्वता: मान्यता देण्यात आली आहे*
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, महाराष्ट्र राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे काटकर साहेब, आमदार कपिल पाटील साहेब, आमदार जयंत आसगावकर साहेब, आमदार किशोर दराडे साहेब, संगिताताई शिंदे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे वितेश खांडेकर बैठकीस उपस्थित होते.संप मागे – जुन्या पेंशनची मागणी तत्वतः मान्य ; 2005 पूर्वीच्या आणि नंतरच्याही शिक्षकांनाही लागू होणार जुनी पेंशन*
3 महिन्यात कमिटी पेंशनचे काम पुर्ण करणार मुख्यमंञी महोदयांचे आश्वासन मिळाले आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, आमदार कपिल पाटील साहेब, आमदार जयंत आसगावकर साहेब, आमदार किशोर दराडे साहेब, महाराष्ट्र राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे श्री. काटकर साहेब, संगिताताई शिंदे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे श्री. वितेश खांडेकर यांच्या समवेत झालेल्या मिटिंग मध्ये कर्मचाऱ्यांची पेंशनची मागणी 3 महिन्याच्या कमिटीमध्ये तत्वतः मान्य करण्यात आली आहे.यावेळी शिक्षण विभागातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेंशन बाबत सकारात्मक चर्चा झाली व लवकरच 2005 पूर्वीच्या आणि २००५ नंतरच्या शिक्षक व शिक्षकेतर सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्या संदर्भात तत्वत: मान्यता मा. मुख्यमंञी महोदयांनी मान्यता दिली. पुढील तीन महिण्यात समिती सकारात्मक अहवाल बनवून मा. मुख्यमंञी, मा. उपमुख्यमंञी यांच्याकडे अहवाल सादर करणार.यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी रोज मा. मुख्यमंञी व मा. उपमुख्यमंञी यांच्याकडे रोज पाठपुरावा करुन, भेटी घेऊन चर्चा करायचे, आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले. तसेच माझ्या बांधवाना पेन्शन नसेल तर मलाही पेन्शन नको म्हणून , मा.विधान परिषद उपसभापतीना “पेन्शन नाकारल्याचे” पत्र ही आज दिले , त्याची ही दाखल शासनाने घेतली.आजच्या सभेमधे राज्य शासकिय, निमशासकीय कर्मचारी यांनी राज्याच्या मुख्यमंञी यांचा समोर संप मागे घेण्याची घोषणा केली.अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख विष्णू विशे यांनी दिली

