महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)
महा.फेडरेशन अपडेट्स
समन्वय समितीची शासनाशी सकारात्मक चर्चा-संप मागे .!!!
![]()

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)
*** महा.फेडरेशन अपडेट्स
*** समन्वय समितीची शासनाशी सकारात्मक चर्चा-संप मागे .!!!
मित्रांनो,
दि.14 मार्च 2023 पासून आपण राज्य समन्वय समितीसह महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)च्या आदेशानुसार एकजूट कायम ठेवून बेमुदत संप आंदोलन अभेद्य ठेवले.त्याबद्दल सर्वप्रथम राज्यातील सर्व शिक्षक/शिक्षकेतर बंधुभगिनी यांचे त्रिवार अभिनंदन!
मा.मुख्यमंत्री महोदय व मा .विश्वासजी काटकर यांची प्रतिनिधीसह सकारात्मक बैठक संपन्न झाली.त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेले बेमुदत संप आंदोलन मागे घेण्यात आल्याचे मंत्रालयातील बैठकीत प्रत्यक्ष सहभागी असलेले आपल्या फेडरेशन चे प्रतिनिधी श्री सतीशजी इनामदार यांनीअधिकृतपणे कळविले आहे.
चर्चेचे इतिवृत्त मिळाल्यानंतर आपल्या फेडरेशन च्या याच ग्रुपवर पाठविण्यात येईल.
आपण उद्यापासून आपापल्या शाळेत नियमितपणे उपस्थित राहून आपली नैमित्तिक कर्तव्ये तसेच एस.एस.सी.बोर्डाच्या परीक्षा उत्तरपत्रिका तपासणी कार्य सुरू करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
आपण संप यशस्वी करण्यासाठी जी “न भूतो भविष्यति ।”अशी एकजूट दाखवली त्याबद्दल पुनश्च आपले सर्वांचे अभिनंदन व आभार!🙏👍🌹
ज्ञानेश्वर कानडे, अध्यक्ष
एस.डी.भिरुड,सेक्रेटरी
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)
पालघर
20 मार्च2023(5.45.pm.)

