1 min read

जागतिक चिमणी दिना निमित्त बालपण स्कूल पानोडी चा
“या चिमन्यांनो परत फिरा रे” उपक्रम उत्साहात संपन्न

Loading

जागतिक चिमणी दिना निमित्त बालपण स्कूल पानोडी चा
“या चिमन्यांनो परत फिरा रे” उपक्रम उत्साहात संपन्न

बालपण स्कूल पानोडी येथे या चिमन्यांनो परत फिरा रे हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने बालपण स्कूल च्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ बर्ड फिडर बनविले व चिऊताई च्या विविध रूपातील चित्ररेखा रंगवत व या चिमण्यांनो परत या च्या घोषणा देत फेरी काढून चिऊताईस वाचविण्याचे आवाहन केले. आज बालपण स्कूल पानोडी च्या चिमुकल्यांनी चिऊताईस अन्न व पाण्याची सुविधेसाठी आकर्षक असे टाकाऊ प्लास्टिक पासून बर्ड फिडर बनवून शाळेच्या आवारातील प्रत्येक झाडास बसवून त्यात अन्न धान्य व पाण्याची सुविधा केली.तसेच चिमुकल्यांच्या माध्यमातून समाजामध्ये चिऊताईओ विषयीचे प्रेम व जिव्हाळा रुजवण्यासाठी चिऊताईच्या विविध रूपातील चित्रकला स्पर्धा घेत विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्र रंगवत चिऊताई ची विविध रूपे दर्शवली.
सदर उपक्रम प्रसंगी बालपण स्कूल च्या प्रमुख सौ सोनाली मुंढे तसेच प्राचार्य व सर्व शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *