1 min read

निंभोरा ता.अमळनेर येथे अस्सल शेतकरी थाटात विवाह संपन्न

Loading

निंभोरा तालुका अमळनेर येथे आजच अस्सल शेतकरी थाटात विवाह संपन्न झाला. अमळनेर येथील गणित मंडळाचे अध्यक्ष व उपक्रमशील शिक्षक डी ए धनगर यांचे भाचे तथा निंभोरा येथील प्रगतीशील शेतकरी खुशाल सुका न्हाळदे यांचा मुलगा राहुल याचा गायत्री शी विवाह सोहळा संपन्न झाला. आपण शेतकरी असल्याची जाणीव न्हाळदे कुटुंबीयांना आहे त्यामुळे नवरदेव चे काका अनिल सुका न्हाळदे व सुनील सुका न्हाळदे यांनी वर वधूला सजवलेल्या बैलगाडीवर बसवून गावाबाहेरच्या विवाह मंडपातून घरापर्यंत वर वघुला गाडी बैलात आणले. यावेळी या नवदांपत्याने सर्वप्रथम बैल जोडी चे पूजन केले त्यानंतर नवरदेवाने स्वतः बैल जोडी गाडीला हाकत नववधू व बारातींसह घरापर्यंत आणले. त्यानंतर नववधू माप ओलांडून गृहप्रवेश केला. या लग्नाचा खूप मोठा वाजागाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात कोणताही बँड नाही अथवा डीजे नाही. टाळ्या वाजवून विवाह लावण्यात आला. विवाह सोहळा साध्या पद्धतीने करून न्हाळदे कुटुंबीयांनी समाजासमोर एक आदर्श घालून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *