1 min read

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्यावर

Loading

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्यावर असताना अमळनेर येथे मोटारसायकल रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत , प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, प्रदेश प्रवक्ता अॅड दीपक राठोड, प्रदेश सचिव किरण पाटील, शुभम बुराडे आदी मान्यवरांनी शहरातील महापुरुषांच्या स्मृतिस्थळांना वंदन केले. तसेच शहरातील विविध चौकात युवकांच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, जेष्ठ नेते अनिल शिंदे, विश्वनाथ ठाकरे ,संभाजी ब्रिगेडचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा नगरसेवक शाम पाटील, नगरसेवक राजेश पाटील, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, अर्बन बँक व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मा. जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, शहराध्यक्ष सनी गायकवाड, क्रिष्णा बोरसे , देव गोसावी , उज्ज्वल मोरे, तेजस पवार, विशाल पाटील, सुमित पाटील, अक्षय चव्हाण, किरण सुर्यवंशी, राजु भाट, शादाब तेली, इद्रिस बागवान, अभिषेक ढमाळ, शरद पवार, योगेश ठाकरे, निखिल पाटील, कुणाल पाटील आदी पदाधिकाऱ्यांकडून शहरातील वेगवेगळ्या चौकात त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

सदरील रॅलीचे आयोजन युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, तुषार संदानशिव, शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *