शालेय शिक्षणाबरोबर मुलांना आवडणारे शिक्षण द्या.
![]()
शालेय शिक्षणाबरोबर मुलांना आवडणारे शिक्षण द्या.
मुले स्मार्ट असल्याने पालकांची जबाबदारी वाढली.
– गुलाबराव पाटील

- ठाणे कल्याण( मनिलाल शिंपी)* – एडयू स्मार्ट ऍक्टिव्हिटी सेंटर मार्फत अबॅकस, सुंदर हस्ताक्षर,वैदिक गणित व कॅलिग्राफी चे शिक्षण दिले जाते. एडयू स्मार्ट ऍक्टिव्हिटी सेंटर च्या भारतात अनेक शाखा असून नुकताच डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय गुणगौरव सोहळा संपन्न झाला. कल्याण पूर्व आदर्श नगर सेंटरचा अबॅकस मध्ये भारतातून दुसरा क्रमांक आला असून त्यांना ट्रॉफी व आर्थिक सहाय्य करून सन्मानित करण्यात आले. कल्याण येथील गुणगौरव कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट चे अध्यक्ष पी. टी.धनविजय सचिव गौतमी धनविजय मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते गुलाबराव पाटील म्हणाले आता पालकांची जबाबदारी वाढली आहे. आताची मुले फार स्मार्ट आहेत बालपणापासूनच त्यांच्या आवडीनिवडी ओळखून बालमनावर पायाभरणी करणे आवश्यक आहे .शालेय शिक्षणाबरोबर त्यांना आवडणारे शिक्षण द्यायला हवे. तुम्ही मुलांच्या गरजा ओळखत नवीन शिक्षण देत आहात हे महत्वपूर्ण आहे.कल्याण सेंटरचे विविध स्पर्धेतील बारा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला शोभित लोखंडे व शुभम तांगडे यांनी अबॅकस प्रश्न मंजुषा स्पर्धेत भारतातून दुसरा क्रमांक मिळवला. कल्पेश पाटील सर यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थी पालकांच्या मेहनतीमुळे आम्हाला दुसरा क्रमांक मिळाला असे सेंटर प्रमुख कविता धनविजय म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता धनविजय यांनी केले तर आभार सचिन धनविजय यांनी मानले.

