जुन्या पेन्शनच्या बेमुदत संपाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जाहीर पाठिंबा
![]()

जुन्या पेन्शनच्या बेमुदत संपाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जाहीर पाठिंबा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील सर्व शिक्षकेतर बांधवांना आवाहन करण्यात येते की, 14 मार्चपासून संपूर्ण राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी संपाचे आवाहन करण्यात आलेले आहे. आपणही सर्व शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या व जिल्हा संघटनेचे आदेशानुसार संपात सहभागी आहोत. तहसील कार्यालय अमळनेर येथे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत बैठकीचे आयोजन केलेले असते. त्याचप्रमाणे संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत बैठकीच्या आयोजन केलेले असते. त्या ठिकाणी सर्व संघटनांच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. परंतु आपल्या शिक्षकेतर बांधव तिथं दिसत नाहीत. तरी आपणास आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थिती द्यावी संपास पाठिंबा द्यावा. त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून. तहसील कचेरी पर्यंत मोर्चाचे आयोजन केलेले आहे. आपण तालुक्यातील सर्व शिक्षकेतर बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणे चे आव्हान तालुका संघटना व जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे असे आर डी बोरसे जिल्हाध्यक्ष.के जे पाटील तालुकाध्यक्ष, सुनील चौक तालुका सचिव अमळनेर तालुका खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना यांनी कळविले आहे.

