1 min read

मुंबईत अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे आंदोलन

Loading

मुंबईत अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे आंदोलन

“एकच मिशन जुनी पेंशन” च्या घोषणांनी शिक्षण निरीक्षक कार्यालय दणाणले

मुंबई (मनिलाल शिंपी) जुनी पेन्शनच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत आज मुंबईत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांनी आंदोलन केले.
चेंबूर मधील शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले
आंदोलनात शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या अधीक्षक नीता पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले यामध्ये निवेदनात २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व नंतर अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना तसेच २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला भाजपा शिक्षक आघाडीचे उत्तर विभागाचे अध्यक्ष दशरथ काशीद, प्रदेश सदस्य बयाजी घेरडे, सुभाष अंभोरे, विजय धनावडे, जुनी पेंशन समितीचे मदनलाल दुबे, संजय परदेशी, प्रतिभा तिवारी, संगीता पष्टे, सविता पाटील, अनिल जंगले, प्रभाकर पवार, ओ पी उपाध्याय, उमेश हसबे, वनिता चव्हाण, शालिनी मोते, एस एम गायकवाड, के एस कांबळे, एम टी कदम, संतोष गायकर, ए एस शेंडकर, बी एम साळुंखे, अश्विन बोरनारे, अवधूत चव्हाण, अमोल जागले, ललिता चोपडे, जयश्री ढोरे, मनीषा कदम, शीतल दंडवते, मुमताज खान, संगीता गजरे, संगीता बोडके, सोनल विश्वकर्मा, कलावती पंत, अजय कोरी, श्रीकांत अहिरे, अस्लम मुलांनी दिगंबर पाटील, अस्लम पटेल, ज्ञानेश्वर पाटील, नासिर जमाल, अय्याज शेख आदी उपस्थित होते
चेंबूर मधील शिक्षण निरीक्षक कार्यालय च्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले
आजपासून जुन्या पेंशन साठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *