1 min read

अमळनेर येथे मोफत यूपीएससी फाउंडेशन कोर्स सुरू(मिशन आयएएस अमळनेर)

Loading

अमळनेर येथे मोफत यूपीएससी फाउंडेशन कोर्स सुरू(मिशन आयएएस अमळनेर)

सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळाचा उपक्रम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खान्देशचा टक्का वाढावा याउद्देशाने सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन आयएएस (अमळनेर ) युपीएससी फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात आला आहे.ऑनलाईन व ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने मार्गदर्शन केले जाणार आहे.
आपणही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस आयपीएस व्हावं हे खान्देशातील अनेक सामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबातील तरुणांचं स्वप्न आहे. परंतु आर्थिक परिस्थिती मुळे मुले हुशार असून देखील काहींवेळेस ते शक्य होत नाही.पुणे दिल्ली याठिकाणी राहणे व फी भरणे सर्वांना शक्य नाही याकरिता हे अभियान राबविण्यात येत आहे.याअंतर्गत विद्यार्थ्यांना युपीएससी पूर्व ,मुख्यपरीक्षा व मुलाखतीची तयारी करण्यात येणार आहे यासाठी पुणे दिल्ली मुंबई जळगांव येथील नामवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक (Faculty)मार्गदर्शन करणार आहेत।त्याच बरोबर यूपीएससी व एमपीएससी उत्तीर्ण प्रशासनातील अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.युपीएससीची संपूर्ण बेसिक तयारी यात करण्यात येईल तीही पूर्णपणे मोफत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपले अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम नक्कीच वरदान ठरणार आहे.
दर रविवारी ऑनलाइन किंवा ऑफलाईन मार्गदर्शन होईल.तांत्रिक बाबींसाठी पंकज कॉम्पुटर सेंटरचे सहकार्य मिळणार आहे.सानेगुरुजी ग्रंथालय अमळनेर उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ यांचेही अनमोल सहकार्य व मार्गदर्शन मिळणार आहे।
ज्या तरुणांना युपीएससी परीक्षेची तयारी करायची आहे आणि ते 12 वी उत्तीर्ण आहेत त्यांनी सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंग पवार यांच्याशी 7020432816 किंवा 8007535093 संपर्क करावा।

सध्या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे दिवसेंदिवस परीक्षेची काठिण्य पातळी वाढत आहे त्या स्पर्धेत आपला तरुण टिकला पाहिजे म्हणून 12 वी उत्तीर्ण झाल्याबरोबर त्याला यूपीएससीच्या परीक्षा पॅटर्न कसा असतो अभ्यासक्रम काय आहे ऑपशनल विषय कोणता निवडावा एनसीइआरटी बुक्स,संदर्भग्रंथ पूर्व मुख्य परीक्षा मुलाखत या सर्व गोष्टींचा परिचय होईल त्याचा आत्मविश्वास वाढेल व भविष्यात तो यशस्वी होईल त्यासाठी उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ व सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे नियोजन केले आहे, खानदेशी टक्का वाढावा यासाठी हा प्रयत्न सर्व मिळून करत आहोत.
कपिल पवार
उपसंचालक नागपूर विकास प्राधिकरण,लेखक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

मिशन आयएएस उपक्रमांतर्गत पहिले मार्गदर्शन सुरू
रविवार दिनांक 12 मार्च रोजी पुणे येथील नामवंत यूपीएससी क्लासेसमधील अनुभवी मार्गदर्शक आदित्य केदारी सर यांचे इंडियन पॉलिटी याविषयावर दोन तास ऑनलाईन उत्कृष्ट व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन झाले बावीस विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या उपक्रमात सहभाग नोंदविला.आदित्य केदारी यांनी पूर्व व मुख्य परीक्षा तसेच यूपीएससीची तयारी कशी करावी अभ्यास कसा करावा याबद्दल माहिती दिली विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला दिसून येत होता.सर वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत.ऑनलाईन लेक्चर साठी पंकज कॉम्पुटर सेंटरचे सहकार्य लाभले।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *