मौलाना आझाद फाउंडेशनचे काम कौतुकास्पद
मनोज पाटील
अध्यक्ष- स्वामी समर्थ शैक्षणिक संस्था जळगाव
भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा वितरण उत्साहात संपन्न
![]()
मौलाना आझाद फाउंडेशनचे काम कौतुकास्पद
मनोज पाटील
अध्यक्ष- स्वामी समर्थ शैक्षणिक संस्था जळगाव
भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा वितरण उत्साहात संपन्न
जळगांव प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-जेव्हा चांगल्या कामाची दखल घेतली जाते. तेव्हा एखाद्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. तेव्हा तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराने जबाबदारी वाढते.तेव्हा आपण विविध क्षेत्रांत कार्य करतो तेव्हा मिळालेल्या पुरस्काराचे चिज होते.अशा विविध क्षेत्रातील बांधव व भगिनींना पुरस्काराने सन्मानित केले गेले. मौलाना आझाद फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे असे जळगांव जिल्हाधिकारी अल्पभवन बचत सभागृहात भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब मनोज पाटील बोलत होते.
विचार पिठावर आमदार राजूमामा भोळे,महापौर जयश्रीताई महाजन,संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख,इकरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, नोबेल स्कूलच्या चैअरमन अर्चना सुर्यवंशी, अँड खलील देशपांडे, जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी विजय परदेशी, शिक्षणाविस्तराधिकारी खलील शेख,
सामाजिक कार्यकर्त्यां नवेदिता ताठे,भारतीताई मस्के,हर्षाली पाटील, छाया केळकर, राष्ट्रपती पुरस्कार शिक्षिका डॉ पाकिजा पटेल, प्रतिक्षा पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले. ते म्हणाले की तेरा वर्षापासून संस्थेचे काम करतांना अनेकांचे मला सहकार्य लाभले. संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबवीत वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत कार्य करीत असल्याचे समाधान मिळत आहे असे सांगितले.
यावेळी महापौर जयश्री महाजन,विजय परदेशी, अब्दुल सालार, खलील देशपांडे, खलील शेख यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की
पुरस्कार घेण्यापेक्षा पुरस्कार देणारा मोठा असतो.मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष, व पदाधिकारी यांनी सर्व क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित केले हे कौतुकास्पद आहे.
संस्थेच्या माध्यमातून असेच सामाजिक कार्य होत राहो अशा शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार्थी मनोगतात पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त पत्रकार ईश्वर रामदास महाजन अमळनेर यांनी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा
उहापोह करत भारतरत्न मौलाना आझाद संस्थेचा पत्रकारिता पुरस्कार निश्चितच कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन आदर्श शिक्षिका ज्योती राणे मँडम यांनी केले.आभार हर्षाली पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष सलीम इनामदार, सहसचिव जगदीश सपकाळे, सदस्य नईम शेख, सदस्य प्रवीण पाटील, चंद्रशेखर कापडे, मनोज भालेराव, मोनाली कुमावत, सपना श्रीवास्तव, भारती मस्के, हर्षली पाटील, ज्योती राणे, छाया केळकर यांनी प्रयत्न केले.


यांचा झाला सन्मान
जितेंद्र पांडुरंग लोखंडे – क्रीडा शिक्षक
सुधीर संजय सावळे – पोलीस कर्मचारी
अंजुम शफात खान – सामाजिक
आश्विन लिलाचंद पाटील – पर्यावरण
वैशाली रंगलाल राठोड – शैक्षणिक
जयवर्धन दुर्गादास नेवे -सामाजिक
मनीषा पांडुरंग पारधी -सामाजिक
संदीप मधुकर सोनार – शैक्षणिक
ऋषिकेश सुकदेव जाधव – शैक्षणिक
सविता सखाराम माळी – सामाजिक
कविता रमेश पाटील – शैक्षणिक
पूनम चंद्रकांत बेडसे – सामाजिक
आप्पासाहेब बाजीराव नरवडे – सामाजिक
समाधान शिवाजी पवार – सामाजिक
उस्मान फकिरा पटेल – शैक्षणिक
पाकिजा उस्मान पटेल – शैक्षणिक
राजेंद्र देवराम कोळी – शैक्षणिक सागर पाटील शैक्षणिक जळगांव
दिव्या यशवंत भोसले – सामाजिक
अभिजित रंधे – सामाजिक
नयना अरुण झोपे (महाजन )– वकील
भास्कर यशवंत ठाकरे – हेड कॉन्स्टेबल
कल्पना सुनील वसाने – शैक्षणिक
मीनाक्षी ज्ञानदेव झांबरे – शैक्षणिक
मनीषा किशोर पाटील – सामाजिक
प्रीती पाटील – शैक्षणिक
राहुल प्रकाश पाटील – शैक्षणिक
चारुशीला जनार्दन जावळे – शैक्षणिक
हर्षदा निलेश वाघ – उद्योजक
स्वाती लहू भिरुड – शैक्षणिक
प्रफुल्ल रमेश निकम – क्रीडा
तुषार रूपचंद वाघुळदे – सामाजिक
प्रतिभा भास्कर ढाके – क्रीडा
संगीताताई राजेंद्र भामरे – सामाजिक
ईश्वर रामदास महाजन – पत्रकारिता
शैलेंद्र विठ्ठल ठाकूर – पत्रकारिता
गौरव सुभाष भोळे – शैक्षणिक
मोहिसिन शरीफ काझी – सामाजिक
मोहिनी प्रकाश सुरवाडे – शैक्षणिक
निरंजना तायडे – शैक्षणिक
सुनिल रमेश बडगुजर – शैक्षणिक
सागर विलास महाजन – शैक्षणिक
निलेश गोकुळ लोहार – सामाजिक
शेख कमलोद्दिन हुस्नोद्दिन – शैक्षणिक







