1 min read

डोंबिवली स्काऊट गाईड स्थानिक संस्थेतर्फे चित्ररंगभरण स्परधेचा पारितोषिक वितरण संपन्न
विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी व मनातील ताणतणाव करण्यासाठी प्रत्येक स्पर्धेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा- किशोर अढळकर

Loading

डोंबिवली स्काऊट गाईड स्थानिक संस्थेतर्फे चित्ररंगभरण स्परधेचा पारितोषिक वितरण संपन्न
विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी व मनातील ताणतणाव करण्यासाठी प्रत्येक स्पर्धेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा:: किशोर अढळकर
ठाणे (मनिलाल शिंपी ) डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था डोंबिवली व विश्र्वा इंजीनियरिंग सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त चित्र रंगभरण स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आज मंजुनाथ विद्यालय डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अजय कुलकर्णी प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ डोंबिवली, किशोर आढळकर रोटरीयन मीड टाउन , व्ही के शिरसाट सीनियर सेक्शन इंजिनियर रेल्वे, डॉ. रामचंद्र शांताराम देसले, मानव सेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, डॉ. मनिलाल शिंपी,कर्नाटका संघ मंजुनाथ विद्यालय डोंबिवली चे अध्यक्ष दिवाकर शेट्टी , उपाध्यक्ष माननीय डॉ.व्हि एम शेट्टी ,कार्याध्यक्ष सुकुमार शेट्टी उपकार्याध्यक्ष देवरास कुलाल, सचिव प्रा.अजित उंब्राणी, सचिव डॉ. दिलीप कोपर्डे ,जिल्हा संघटक आयुक्त गाईड माननीय श्रीमती संगीता रामटेके, जिल्हा संघटक आयुक्त स्काऊट किरण लहाने, तसेच डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप ,सचिव जगदीश उगले, खजिनदार राजू घुले, उपाध्यक्ष एकनाथ चौधरी तसेच स्काऊट मास्टर चंद्रकांत खैरनार, सल्लागार अनंत उत्तेकर, स्पर्धा प्रमुख माननीय शेखर पाटील आयोजक माननीय सुरेखा पंडित मॅडम तसेच मंजुनाथ विद्यालयाच्या सुपरवायझर सौ उत्कर्षा नाईक.व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर स्काऊट गाईड प्रार्थना घेण्यात आली. डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोंबिवलीचे बिझनेस मॅनेजमेंट गुरु, मानवसेवेचे व्रत घेतले किशोर अढळकर यांनी त्यांचा आईवडील यांचा स्मृतिपित्यर्थ सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह उपलब्ध करून दिले. मला सेवा करण्याची संधी मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांच्या प्रेरणेने मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी व मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन किशोर अढळकर यांनी केले.त्यानंतर सर्व शाळेतील एकूण 24 कलाशिक्षकांचा सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर शालेय स्तरावरील सर्व गटातील एकूण 90 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शेखर भागवत पाटील के बी वीरा स्कूल, नारायण आनंदा महाजन आर टी पी हिंदी हायस्कूल , प्रदीप बाळाराम पाटील मॉडेल इंग्लिश स्कूल, दिगंबर कोंडू जोगमार्गे टिळकनगर हायस्कूल यांचा उत्कृष्ट परिक्षक म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. एकनाथ चौधरी, राजू घुले, अशोक जगताप व जगदीश उगले यांनी केले.
सर्व स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन, मुख्याध्यापक, संस्था चालक यांचे डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेतर्फे
सचिव जगदीश यांनी
उगले मनापासून आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *