1 min read

अमळनेरला हिंदी अध्यापक मंडळाने केला पुरस्कार्थी शिक्षकांचा सन्मान.

Loading

अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार समारंभ

अमळनेर प्रतिनिधी
हिंदी अध्यापक मंडळ अमळनेरच्या वतीने विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा नुकताच सत्कार समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे होते.
क्रीडा संघटनेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षक आर टी बागुल, मुकेश पाटील ,अनिल पाटील, शिंपी सर, सी. के पाटील, प्रभुदास पाटील यांचा सत्कार हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे,उपाध्यक्ष
ज्ञानेश्वर ईनशुलकर,सचिव दिलीप पाटील,कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील,मार्गदर्शक सोपान भवरे,सदस्य
एम.आर.तळवी सर,प्रसिद्धी प्रमुख
आय.आर. महाजन उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन सचिव दिलीप पाटील यांनी केले.
सर्व सत्कारार्थी बंधू यांनी हिंदी अध्यापक मंडळाचे धन्यवाद व्यक्त करत हिंदी अध्यापक मंडळ नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी असते असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *