1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन —–!!

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन —–!!

अमळनेर
येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 10 मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आरूषी इंगळे हिच्या वाढदिवसानिमित्त त्या समवेत जान्हवी धनगर, भाविका निकम, वैभवी कुमावत, वंशिका पाटील, दिव्या पाटील, कोमल पाटील, नीलिमा चौधरी या मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार, डी. एस. माळी, आर. डी. महाजन, व्हि. डी. पाटील ,डी. एस. कारले, पी. एम. ठाकरे, एम. एस. सुशीर, आदी शिक्षक उपस्थित होते. तसेच बी.एस. चव्हाण, एस. एस. तेले, पी.पी. पाटील या शिक्षिका हजर होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मनोगत व्यक्त करताना उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आणि सद्य शिक्षण प्रणालीचा सर्व विद्यार्थ्यांना इतिहास कथन केला. त्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक ज्योत आद्य भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, समस्त स्त्री शिक्षणाच्या प्रवाहाची वाट खुली करणाऱ्या तसेच समाजाचा विटाळ असूनही सेन, दगड ,मातीचा मारा सहन करून शाळेची पायरी चढून कायमची शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या मुलींच्या शिक्षणाची बीजे रोऊन आणि पहिलीचा धडा गिरवणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले एक आगळे आणि वेगळे असे शिक्षण प्रवाहातील ज्ञानगंगोत्री होऊन गेल्या. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणासाठी मुलींना प्रवाहित केले नसते तर आजची परिस्थिती किती भयावह असती याची कल्पना करणे सुद्धा अवघड होईल. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *