1 min read

“हा प्रश्न निकाली निघे पर्यंत आम्ही संपावर ठाम आहोत- शेवगाव तालुका समन्वय समिती….

Loading

“हा प्रश्न निकाली निघे पर्यंत आम्ही संपावर ठाम आहोत- शेवगाव तालुका समन्वय समिती….

शेवगावचे तहसीलदार मा. छगन वाघ साहेब व गटविकास अधिकारी श्रीमती.दीप्ती गाठ यांना 14 मार्च च्या संपाचे निवेदन देण्यासाठी उपस्थित सर्व संघटनाचे पदाधिकारी यांनी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे त्या साठी 14 मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

1 नोव्हेबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाकारून आणि शेयर मार्केट वर आधारित पेन्शन योजना आणून शासनाने नवीन कर्मचाऱ्याचे निवृत्ती नंतर चे जीवन अंधकारमय करून टाकले आहे म्हणून सर्वच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.
शासनाने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी तरच हा आक्रोश थांबेल असे मत जुनी पेन्शन संघटनेचे राज्यप्रतिनिधी मच्छिंद्र भापकर सर यांनी व्यक्त केले.

तसेच सर्व कर्मचारी,अधिकारी यांनी 14 मार्च पासून च्या संपात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
या वेळी विलास लवांडे सर,राजेंद्र ढोले सर,विनोद फलके सर,भाऊसाहेब पाचारणे सर,कल्याण मुटकुळे भाऊसाहेब,नितीन मालानी सर, राजेंद्र फरताळे भाऊसाहेब यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करत संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी पंचायत समितीचे लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना,माध्यमिक शिक्षक संघटना,प्राथमिक शिक्षक संघटना,महसूल कर्मचारी संघटना,तलाठी संघटना,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *