1 min read

प्रताप विद्या मंदिरातील स्टेम फोरम मार्फत ‘शिक्षक गुणगौरव’ सोहळा संपन्न

Loading

प्रताप विद्या मंदिरातील स्टेम फोरम मार्फत ‘शिक्षक गुणगौरव’ सोहळा संपन्न

चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात दि. 25/02/2023 शनिवार रोजी दुपारी 4.00 वाजता विज्ञान शिक्षकांसाठी सुरु असलेल्या स्टेम फोरम कार्यक्रमातील ‘ शिक्षक गुणगौरव सोहळा ‘अमळनेरचे प्रसिद्ध पक्षिमित्र श्री.अश्विन पाटील सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी वर्षभरात स्टेम फोरम कार्यक्रमात उत्कृष्ट प्रकल्पसादरीकरण केलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात खालील शिक्षक
श्री.मधुकर चौधरी ,
श्री.नितीन पाटील ,
सौ.प्रियंका पाटील मॅडम यांना श्री आश्विन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पक्षीमित्र अश्विन पाटील सरांनी आपल्या व्याख्यानात ‘पक्ष्यांचे स्थलांतर व त्यामागील विज्ञान ‘या विषयावर पक्षांचे आवाजासह उत्कृष्ट सादरीकरण केले.
त्यानंतर संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, मुख्याध्यापक प्रशांत गुजराथी ,उपमुख्याध्यापक ,.एस.जी.डोंगरे ,उपप्राचार्य जे.एस.शेलार ,पर्यवेक्षिका श्रीमती माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस.एस पाटील ,श्री.पी.डी.पाटील सर्व विभागातील शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.ए.पी.पाटील यांनी तर एस व्हीं करमरकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे फलक लेखन तसेच विज्ञान गीतासाठी संगीतसाथ श्री.पंकज नागपूरे , पी.बी.कोळी यांनी दिली.
कार्यक्रमास तांत्रिक सहकार्य श्री.नितीन पाटील व श्री भुषण पाठक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *