1 min read

बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मुकुंद सपकाळे यांचे आवाहन….

Loading

बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे….

मुकुंद सपकाळे यांचे आवाहन….

जळगाव :बौद्ध साहित्य परिषद आयोजित तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव शहरात आयोजित करण्यात आलेले आहे.
त्या संमेलनाच्या नियोजनाची व विविध समित्यांची आढावा घेण्याची बैठक अजिंठा विश्रामगृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे हे होते.
दिनांक 2 व 3 एप्रिल 2023 रोजी लेवा भवन , जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध साहित्य संमेलनासाठी विविध समित्या गठित करण्यात आलेल्या होत्या.त्या समितींचे कामकाज आणि आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. स्वागत समिती, प्रचार व प्रसार समिती, कार्यक्रम संचलन समिती, ग्रंथ प्रदर्शन समिती, भोजन समिती, निवास व्यवस्था समिती ,धम्मग्रंथ समता दिंडी संयोजन समिती अशा महत्त्वपूर्ण समित्यांच्या बद्दल सूक्ष्म नियोजन करण्यात येऊन सदर संमेलन यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील साहित्यिक विचारवंत या संमेलनामध्ये सहभागी होऊन बौद्ध साहित्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या साहित्य जाणीवांवर प्रकाश टाकणार आहेत. जवळपास हजार प्रतिनिधींची उपस्थिती असणारे या साहित्य संमेलनात बौद्ध साहित्य परिषदेतर्फे आणि बौद्ध साहित्यिकांनी रचलेल्या महत्त्वपूर्ण ग्रंथांवर दोन दिवस अभ्यासपूर्ण मांडणी, विवेचन आणि शासनाला पाठवण्याचे विविध महत्त्वाचे ठराव या साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.
अशी माहिती संमेलनाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी बैठकीत दिली.
बौद्ध साहित्य संमेलनाचे जळगाव शहराचे अध्यक्ष बाबुराव वाघ यांनी या बैठकीच्या पूर्वी प्रास्ताविकेतून संमेलनाची रूपरेषा सांगितली. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी संमेलनाची भूमिका मांडून संमेलन यशस्वी होण्यासाठी कृती कार्यक्रमाची चर्चा केली. हरिश्चंद्र सोनवणे यांनी संमेलनाच्या निवास व्यवस्थेच्या संदर्भात आपले मत मांडले प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
त्याचबरोबर बैठकीतील सहभागी सर्व प्रतिनिधींनी सादक-बाधक चर्चा करून जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे तिसरे बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी करावे अशा सर्वानुमताने निर्णय घेतला.
बैठकीला मिलिंद केदार, संतोष गायकवाड, वाल्मीक सपकाळे, मिलिंद तायडे, महेंद्र केदारे, आनंदा तायडे, यशवंत घोडेश्वर, दिलीप सोनवणे ,गौतम सपकाळे भिवसन अडकमोल ,बापूराव पाटील ,प्रा.प्रितीलाल पवार, भारत सोनवणे, सुनील सोनवणे ,समाधान सोनवणे, राजेश पाटोळे ,प्रकाश दाभाडे ,भारत सोनवणे ,समाधान सोनवणे चंद्रमणी सोनवणे उपस्थित होते. बैठकीचे आभार उदय सपकाळे यांनी मानले. बैठक संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार करून संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *