1 min read

1नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित जुनी पेंशन लावा,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन..

Loading

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन त्वरित लावा.. या संदर्भामध्ये ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने अमळनेरला पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले राज्यात 22000 कर्मचारी आहेत. त्यांची नियुक्ती तारीख ही 2005 पूर्वीची आहे .शासनाने टप्प्याटप्प्याने अनुदान दिले ही शासनाची चुकी आहे. याच्यात कर्मचारी भरडला गेला. इतर सर्व विभागांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आहे. फक्त अंशतः अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पेन्शन पासून वंचित आहेत. अनेक कर्मचारी मृत झाले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारे शासनाने मदत केली नाही तरी आपण पदवीधर आमदार असल्याने हा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दयावा असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन जिल्हा महिला अध्यक्ष वसुंधरा दशरथ लांडगे,तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, जिल्हा संघटक प्रभाकर विंचूरकर, सदस्य श्रावण तेले उपस्थित होते.