शिवबाबा सुप्रीम सोल एनजीओ कडून अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप
![]()


शिवबाबा सुप्रीम सोल एनजीओ कडून अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिवबाबा सुप्रीम सोल एनजीओ, कोलकत्ता यांच्याकडून आज दिनांक ३/३/२०२३ रोजी अनाथ मुले यांच्या साठी शिक्षणिक साहित्य वाटप आणि फूड पॉकेट पुरवण्यात आले.ह्या कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी ब्रहमकुमारी चा रुपा मॅडम, (कोलकत्ता) जितेंद्र गजानन चौधरी , कळमसरे तालुका अमळनेर है एनजीओ कडून उपाध्यक्षस्थानी होते ,डॉक्टर जयेश शिंदे (वाई सातारा) डॉक्टर मुखर्जी कोलकत्ता कुमारी श्वेता ,कुमारी रीया मित्रा,किया डे,आणि तरुण दादा, आणि मास्टर कृष्णा जितेंद्र चौधरी ह्याच्या हातून है वितरित करण्यात आले .ह्या संस्थेचे बरेच असे उपक्रम राबवले जातात.ज्यात कोविड१९ मध्ये लोकांना लागणाऱ्या गरजू वस्तू पूर्ण कोविड १९मध्ये पुरवण्यात आले एनजीओ चे आताचा उपक्रमे मध्ये काही शैक्षणिक स्कूल मा शारदा शिशू स्कूल चालवली जाते. ज्या स्कूल म्हडी फूट पथ वर राहणाऱ्या मुलांची सोय केलीआहे ह्या शाळेत जवळपास ३८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ज्यात त्यांना प्रत्येक सणासुदीला कपडे मिठाई जेवण आणि दैनंदिन लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यात येतात.येणाऱ्या काही दिवसात ही संस्था महाराषट्रातही आपले उपक्रम राबवण्यात येतील गरीब मुलांना जास्तीत जास्त आपन घेत असलेले शिक्षणाचे महतव आणि भविष्यात त्याचा काय उपयोग होतो असे शिबिर आयोजित केले जाते ,तसेच हेल्थ कॅम्प एज्युकेशनल कॅम्प आयोजित करण्यात येतात.

