1 min read

शाळा आणि शिक्षण व्यक्तिमत्व घडवण्याचे महत्वपूर्ण माध्यम.
महापौर जयश्री महाजन

Loading

शाळा आणि शिक्षण व्यक्तिमत्व घडवण्याचे महत्वपूर्ण माध्यम.
महापौर जयश्री महाजन

शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शाळा आणि शिक्षणामुळे जो अमुलाग्र बदल व्यक्तिमत्त्वात घडून येतो त्या बदलाने आयुष्य सुंदर सजलेले असते आणि यातून आपल्या जीवन विकासाचे मार्ग लक्षात येत असतात असे विचार असोदा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना महापौर जयश्री महाजन यांनी आपले मत व्यक्त केले त्यापुढे म्हणाल्या, जीवनात यशस्वी होण्यासाठी नेेहमी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे, मात्र त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्या स्वप्नांना कठोर परिश्रमाची जोड देणे गरजेचे असल्याचे मत देखील त्यांनी याप्रसंगी मांडले. प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार दीपक पटवे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थी जीवनात आपल्याला ज्या काही चांगल्या सवयी लागत असतात त्या सवयी निश्चितपणे आयुष्याला पूरक ठरत असतात., आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वात शिक्षकांचा आणि संस्थेचा अतिशय महत्त्वाचा वाटा निश्चितपणे असतो हे विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये आपल्या जगण्याला बळ देणारी समाज व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकेल यासाठी आपल्या प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचे मत देखील त्यांनी याप्रसंगी मांडले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर नृत्य सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली.
विचार मंचावर ज्येष्ठ पत्रकार दीपक पटवे, संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी, चेअरमन उद्धव पाटील, संचालक किशोर चौधरी, गोपाळ भोळे, किशोर कोल्हे, पंडीत चौधरी, वंसत चिरमाडे, दुर्गादास भोळे, प्रमोद आटाळे, यांच्यासह सत्कारार्थी उद्योजक नितीन महाजन, सुनील चौधरी, डॉ. महेंद्र चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे उपस्थित होत्या. डॉ. मिलींद बागूल यांनी मान्यवरांचा परीचय
करून दिला. मुख्याध्यापक विद्या खाचणे यांनी प्रास्ताविक व वार्षीक अहवालाचे वाचन केले. सत्कारार्थींचा परिचय गोपाळ महाजन यांनी करून दिला. बक्षीसांचे वाचन मंगला नारखेडे, संतोष कचरे, प्रेमराज ब्रहटे यांनी तर सूत्रसंचालन शुभांगीनी महाजन यांनी केले. आभार चारुलता टोके यांनी मानले. सत्कारार्थी डॉ. महेंद्र चौधरी, योगिता नारखेडे यांनी मनोगतातून विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी दहावीत प्रथम आलेल्या मोनाली कोल्हे, मुलांमधून प्रथम राहुल चौधरी यांच्यासह पाचवी ते नववीतील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *