1 min read

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा उदया अमळनेरला नागरी सत्कार…

Loading

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा उदया नागरी सत्कार…

अमळनेर प्रतिनिधी
सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,नागरिक , संस्थाचालक ,व्यापारी ,राजकीय व्यक्ती , पक्षीय पदाधिकारी पदाधिकारी ,समाजाध्यक्ष ,पदवीधर , कामगार आदिना कळवण्यात आनंद होत आहे की नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय सत्यजित तांबे हे दिनांक ४ रोजी अमळनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यानिमित्त त्यांचा सर्वपक्षीय जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने ज्या संस्था ,शिक्षक ,संघटना यांच्या काही मागण्या असतील , समस्या असतील त्या देखील स्वीकारून प्राधान्यक्रमाने अमलात आणल्या जातील. त्यावर चर्चा ,उपाययोजना साठी प्रयत्न केले जातील म्हणून सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच या नागरी सत्कार समारंभास मराठा मंगल कार्यालय अमळनेर येथे आहे असे आवाहन अमळनेर तालुका नागरी समिती यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *