1 min read

महाराष्ट्र पत्रकार संघाने चाळीस वर्षांपासूनचा वाद अखेर मिटवला; महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.किरण जाधव यांचे महत्त्वपूर्ण योगदान

Loading

महाराष्ट्र पत्रकार संघाने चाळीस वर्षांपासूनचा वाद अखेर मिटवला; महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.किरण जाधव यांचे महत्त्वपूर्ण योगदान

जुन्नर तालुक्यातील एकाच कुटुंबातील देव्हांडा जमिनीवरील वाद मागील 40 वर्षांपासून सुरु होता. एकाच रक्ताच्या नात्यातील पोलीस व शिक्षक असे सुशिक्षित कुटुंब पण जागेचा वाद काही मिटत नव्हता… दोघांवरही 3 व 2 असे एकूण 5 केसेस दाखल होते. दोन्ही गटाचा वाद इतका विकोपाला गेला होता कि 27/2/2023 रोजी विनयभंगाची (कलम 354) ची केस दाखल झाली. ही केस सोडविण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे वेल्हे तालुकाध्यक्ष सुरेश कोळी यांच्याकडे आली. श्री. कोळी यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. किरणजी जाधव साहेब, राज्य संपर्कप्रमुख सिकंदरसिंगजी दुधानी साहेब, पुणे जिल्हा सचिव विजयजी जगताप साहेब यांच्याकडे सोपवली. त्यानुसार दोन्ही गटातील मंडळी, आळंदी विभागाचे 🅓🅨🅢🅟 रविंद्र चौधर साहेब व महाराष्ट्र पत्रकार संघाची टीम यांची पुणे जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात संयुक्त बैठक दि.2/3/2023 रोजी सायंकाळी 6:00 ते 9:00 या वेळेत संपन्न झाली. दोन्हीकडील बाजू समजून घेत दोघांवरही अन्याय होणार नाही असा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पंचांनी घेतला. दोघांनी हसतमुखाने मान्य करत दाखल झालेले सर्व गुन्हे लोकअदालतीमध्ये मिटवून घेण्याचे लेखी मान्य केले.
हे प्रकरण मिटविण्यासाठी मुख्य पंच म्हणून भूमिका बजावण्यासाठी प्रा. किरण जाधव साहेब यांनी घेतलेली भूमिका अत्यंत वाखाणण्याजोगी होती. त्याबद्दल त्यांचे व टीमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र पत्रकार संघ 👍🏻👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *