1 min read

सम्राट अशोक विद्यालय परीक्षा केंद्रावर पालकांचे विद्यार्थ्यांबरोबर गुलाब पुष्प देत स्वागत

Loading

सम्राट अशोक विद्यालय परीक्षा केंद्रावर पालकांचे विद्यार्थ्यांबरोबर गुलाब पुष्प देत स्वागत

ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) – दहावीची बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नववी पास झाल्यापासून मुलांवर पालक दडपण आणत असतात तुला आता बोर्ड परीक्षा द्यायची आहे अभ्यास कर चांगले गुण मिळव.आता गुरुवार पासून बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. सम्राट अशोक विद्यालयात परीक्षेच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय यांच्यासह परीक्षा केंद्र संचालक गुलाबराव पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे व माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांचे शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ गुलाब पुष्प देत स्वागत केले .विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी मनात भीती निर्माण होते. आपल्या मुलाला पेपर कसा जाईल याचा ताणतणाव पालकांनाही असतो. परीक्षा केंद्रावर मुलांना घेऊन आलेल्या पालकांचे अनपेक्षित पणे स्वागत केल्याने पालकांच्या चेहऱ्यावर खुशी जाणवत होती सुषमा कुंभलकर पालक म्हणाले परीक्षा केंद्रावर आल्याने खरच भीती वाटत होती. परंतु गुलाबराव पाटील सर यांच्या शुभेच्छा रुपी मार्गदर्शन आणि परीक्षा केंद्रावरील काढलेले रांगोळी, झेंडूच्या पाकळ्यांची सजावट आणि गुलाब पुष्प देऊन केलेले स्वागत या वातावरणाने मी भारावून गेली आणि मनावरील दडपण दूर झाले .विशेष म्हणजे परीक्षा झाल्यावर पहिला पेपर चांगला गेला. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *