1 min read

ज्येष्ठांची सावली पुढच्या अनेक पिढ्यांना दूरदृष्टी देत असते.
डॉ.मिलिंद बागुल.

Loading

ज्येष्ठांची सावली पुढच्या अनेक पिढ्यांना दूरदृष्टी देत असते.
डॉ.मिलिंद बागुल.

ज्येष्ठांच्या जगण्याचा सर्वार्थाने आधार पुढच्या पिढीच्या जीवनमानाला उंचावण्यासाठी, त्यांच्या जगण्याला अर्थपूर्ण करण्यासाठी असतो, जेष्ठांच्या जगण्यातून मिळालेली सावली पुढच्या अनेक पिढ्यांना दूरदृष्टी देत असते कुटुंबातल्या ज्येष्ठांचे अस्तित्व हेच मुळात आपल्या जगण्याला सुकर करत असते हे अनेक जण विसरतात आणि यामुळेच दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची वाढ होत असल्याचे मत साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी असोदा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त प.पूज्य सद्गुरु झेंडूची महाराज समाधी मंदिरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष चिंधू सुका महाजन होते.डॉ.बागुल यावेळी बोलताना पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हे निश्चितपणे कुटुंबाला, सामाजिक व्यवस्थेला दिशादर्शक तथा मार्गदर्शक देखील असतात त्यांच्या मार्गदर्शनातून कुटुंब घडत जात असते, कुटुंबाची योग्य प्रकारे वाटचाल होत असते आणि या वाटचालीतून कुटुंबाची स्वतंत्र ओळख देखील निर्माण होत असते यातून समाज, देश घडत असतो यासाठीच ज्येष्ठांची काळजी घेणे त्यांच्या अनुभवाची शिदोरी सोबत घेणे ही पुढच्या पिढीची जबाबदारी असल्याचे देखील मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.अनिल दोधू महाजन आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, ज्येष्ठांच्या अनुभवांचा आणि जीवनातील एकूणच अनेक वाटचालींचा आदर्श नव्या पिढीने घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे या प्रयत्नातून आपल्या परिसराचा आणि कुटुंबाचा विकास होत असतो असे मत त्यांनी याप्रसंगी मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक, अतिथी परिचय ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष डी.एन. सावदेकर यांनी केला. ७५व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या व वाढदिवस असणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष आर. एस. सावदेकर व विद्यमान अध्यक्ष डी.यू.भोळे यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. डी. एन.पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले, आर.बी. महाजन,सुदाम चौधरी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक प्रफुल्ल सावदेकर, कृष्णा पाटील, डिगंबर पाटील, प्रल्हाद नारखेडे व ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *