1 min read

भुसावलचे मैदान अमळनेरचा पवनकुमार शिंपीने गाजवले….

Loading

भुसावळ येथे अमळनेरच्या पवन पहिलवानने मानाची कुस्ती

अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील भुसावल येथील मानाच्या कुस्तीच्या दंगलीमध्ये अमळनेर येथील जय हिंद व्यायाम शाळेचे पैलवान पवनकुमार शिंपी विजयी ठरल्याने जिल्ह्यात तो कौतुकाचा मानकरी ठरला.
सर्वांचे लक्ष असलेल्या या दंगलीत पवन ने आपला हूनर दाखवून रसलपुर येथील पैलवान अबुजर याला चित केले.या विजयाने पवनने भुसावळ मध्ये आपली छाप सोडून अमळनेरचे नाव उज्वल केले आहे.पवन पहिलवान हा सर्वच कुस्त्यांच्या दंगलीत विजयी ठरत असल्याने भविष्यात हा पहिलवान राज्यात राज्यभर गाजेल असे संकेत मिळत असून या विजयाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *