1 min read

ग्रुप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा व जनता ग्रुप अपघात विमा ऐच्छिक करा
=शिक्षक भारती ने ग. स. अध्यक्षांना दिले पत्र =

Loading

ग्रुप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा व जनता ग्रुप अपघात विमा ऐच्छिक करा
=शिक्षक भारती ने ग. स. अध्यक्षांना दिले पत्र =

माननीय संपादक साईमत दिनांक 28/2/2023
ग. स.सोसायटीत सहकार गटाने नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा 5 लाख व ग्रुप जनता अपघात विमा 10 लाख संपूर्ण 36 हजार सभासदांना लागू करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे व त्याचे प्रीमियम 2596 रुपये वार्षिक ठेवण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता नॅशनलाईज बँकेत 1000 रुपयात 20 लाख रुपयांच्या अपघाती विमा मिळतो आणि तो आज रोजी जवळपास सर्वच सभासदांनी घेतलेला आहे महाराष्ट्र शासन वित्त विभागाने 24 जानेवारी 2023 रोजी एक जीआर काढलेला आहे त्यानुसार 300 रुपयात दहा लाख रुपयांच्या अपघाती विमा संपूर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे सॅलरी अकाउंट असल्यामुळे आज रोजी त्यांना 20 लाख रुपये अपघाती विमा संरक्षण मिळत आहे सहकार गटाने संपूर्ण सभासदांवर 2596 रुपये वार्षिक आर्थिक बोजा लादण्याच्या निर्णय घेतलेला आहे.

आपल्या जिल्ह्यातील राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव संस्थेची सहकारी पतपेढीत आयसीआयसीआय कंपनीने नैसर्गिक व अपघाती पाच लाख रुपयांच्या विम्यासाठी 1750 रुपये प्रीमियम असताना आणि आपले सभासद संख्या 36 हजाराच्या वर असताना एवढा महाग विमा सक्तीचे करणे अनाकलनीय आहे. ग्रुप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा व ग्रुप जनता अपघात विमा ऐच्छिक करावा असे मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती सुनिता पाटील संदीप परदेशी अध्यक्ष कला अध्यापक आघाडी यांनी सहकार गटाकडे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *