1 min read

२ मार्च रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी मोर्चा

Loading

दि.२ मार्च रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी मोर्चा

दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल.असे आश्वासन दि.१२ फेब्रुवारी रोजी मा. मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांनी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बाल विकास मंत्री मा.मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीसह अनेकदा आश्वासने दिली आहेत. परंतु शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही.म्हणून दि.२३ फेब्रुवारी पासून राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.

. शासनाने समान किमान कार्यक्रमांतर्गत भरघोस मानधन वाढ करण्यासह,शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, नवीन व अद्ययावत मोबाईल, सेविका व मुख्यासेविका भरती प्रक्रियेत वयाची आणि शिक्षणाची अट शिथिल करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन,मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटी, आजापणाची रजा, सेवा समाप्तीचा एक रकमी लाभ तात्काळ अदा करावा
या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.२ मार्च रोजी आझाद मैदान (मंत्रालय) मुंबई येथे राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे.
सदर मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दि.२ मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी १० वाजेपर्यंत शंभर टक्के भागिदारी करुन यशस्वी करावा.असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्यासह मिनाक्षी चौधरी,मंगला नेवे,पुष्पा परदेशी,सविता महाजन,चेतना गवळी,सुनंदा नेरकर,रेखा नेरकर,आशा जाधव,शकुंतला चौधरी, सरला पाटील,शोभा जावरे,रत्ना सोनवणे,सुलोचना पाटील, शुभांगी बोरसे, उज्वला पाटील, निता सुरवाडे, संगिता निंभोरे साधना पाटील,वंदना पाटील,नंदा देवरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *