1 min read

पावबा बच्छाव यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..

Loading

पावबा बच्छाव यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..
मुंबई ,ठाणे ( मनिलाल शिंपी ):क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभ दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा वाजदरे,ता.साक्री, जिल्हा धुळे येथिल शिक्षक श्री.पावबा धंजी बच्छाव यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पर्यटन मंत्री श्री. मंगलप्रभात लोंढा यांच्या शुभहस्ते, शिक्षक आमदार कपिल पाटील,शिक्षण आयुक्त,कौस्तुभ दिवेगावकर (भा.प्र.से), रणजितसिंग देवोल (प्रधान सचिव),कृष्णकुमार पाटील (शिक्षण संचालक), शरद गोसावी (प्राथमिक शिक्षण संचालक) मान्यवरांच्या उपस्थितीत रंगशारदा सभागृह, के.सी.मार्ग, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे. (पश्चिम) मुंबई येथे भव्यदिव्य ,नयनरम्य दिमाखदार पद्धतीने यथोचित सन्मान करून सहकुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *