शिवरायांच्या विचारातून सशक्त समाज निर्मिती
-. प्रा गणेश पाटील: नंदुरबार
![]()


शिवरायांच्या विचारातून सशक्त समाज निर्मिती
-. प्रा गणेश पाटील: नंदुरबार ( प्रतिनिधी ):कृषी महाविद्यालयात शिवजयंती निमित्त इतिहासाला उजाळा
नंदुरबार,… शिवचरित्राचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन करावे .शिवकालीन इतिहास सांगताना प्रा. पाटील म्हणाले की शेतकऱ्याच्या काळीच्या देठालाही धक्का लागत नव्हता, परंतु सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला असून शिवराज्यातील दिवस मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवरायांच्या विचारातून सशक्त समाज निर्मिती करूया, असे आवाहन प्रा. गणेश पाटील यांनी कृषी महाविद्यालयात झालेल्या शिवजयंती निमित्त शिवरायांच्या शौर्याचा व त्यांच्या राज्यकारभाराचा इतिहास मांडताना केले. येथील कृषी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राष्ट्रीय प्रबोधनकार व व्याख्याते गणेश पी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा.डाॅ.यु.बी.होले अध्यक्षस्थानी होते. अंकुर सेवाभावी संस्थेचे संचालक कैलास मराठे उपस्थित होते. यावेळी डॉ. यु पी होले म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिवचरित्र आत्मसात करून प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखले पाहिजे व कर्तव्य पुरतीला प्राधान्य देऊन आपले काम केले पाहिजे. तरुणांनी आयुष्यात आत्मविश्वास जागवला तर ते यशाची शिखरे गाठू शकतील फक्त गरज आहे ते आपल्यातील क्षमता ओळखण्याची.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस यु बोराले डॉ .डि.बी.अहिरे डाॅ.एस डी.पाटोळे व महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. एस जी राजपूत यांनी प्रास्ताविक केले विद्यार्थ्यांनी प्राजक्ता भाकरे व जानवी गावित यांनी सूत्रसंचालन केले अक्षता तळवी हिने आभार मानले.

