1 min read

संस्कृत ची प्रश्नपत्रिका पैकी च्या पैकी गुण मिळवून देणारी….

Loading

संस्कृत ची प्रश्नपत्रिका पैकी च्या पैकी गुण मिळवून देणारी
‘संस्कृति: संस्कृताश्रिता‘ अर्थात् भारत ची संस्कृति संस्कृत भाषा वरच आश्रित किंवा निर्भर आहे या उक्ति ला अनुसरून च
संस्कृत विषय हा संस्कृती सोबतच गुणांची टक्केवारी वाढवणारा विषय म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आवडीचा ठरलेला आहे. प्रत्येक विद्यार्थी संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतो. कृतिपत्रिकेचा विचार करता ही संपूर्ण अभ्यासक्रमावर १००(८०) गुणांची कृतिपत्रिका असली तरी पाठ्यपुस्तकाच्या संस्कृत आह्लादः या नावाप्रमाणे आह्लादकारक होती. सर्व सामान्य विद्यार्थी सुद्धा चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण होतील तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नियोजन पूर्वक संपूर्ण सोडवली असेल त्यांना निश्चित ‘पैकीच्या पैकी गुण मिळवणे’ हे ध्येय सहजसाध्य करता येईल. कृतिपत्रिकेची घटकनिहाय व गुणनिहाय विभागणी ही नियमानुसार होती. अशाप्रकारे कृतिपत्रिकेमध्ये एक /दोन प्रिंटींग मिस्टेक सोडता काहीही चूका नाहीत अवबोधन, शब्दसंपत्ती, कार्यकारण भाव, प्रश्ननिर्मिती, पृथक्करण, स्पष्टीकरण, क्रमसंयोजन लेखनकौशल्य, उपयोजन,भाषांतर, वाक्यातील सहसंबंध जाणणे इत्यादी अनेक कृतींचा समावेश केलेला आहे . ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्य ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी विविध कृतींची योजना संस्कृत च्या कृतिपत्रिकेत करण्यात आली होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *