1 min read

लोकशाहीचा डोलारा सांभाळायचा असेल तर पत्रकांरानी सरकारच्या ताटाखालील मांजर होऊ नका…

Loading

लोकशाहीचा डोलारा सांभाळायचा असेल तर पत्रकांरानी सरकारच्या ताटाखालील मांजर होऊ नका…

संदीप घोरपडे यांचे जिल्हा पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्हा पत्रकार संघ आयोजित आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने व जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला पत्रकार संघाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ता म्हणून संदीप घोरपडे अमळनेर यांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या नजरेतून आजची पत्रकारिता व लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता दशा व दिशा या विषयावर व्याख्यानासाठी आमंत्रित केले व तेथे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित केले तो क्षण व त्या क्षणी व्यक्त केलेले पत्रकारितेविषयीचे विचार उपस्थितांना भावले एवढेच नव्हे तर त्यानंतर श्रोत्यांनी संदीप घोरपडे यांच्या वक्तव्याचे भरभरून कौतुक केले या कौतुकाच्या वर्षावात कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमानंतर ज्येष्ठ पत्रकार विजय बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थितांनी विजय बापू यांचे अभिष्टचिंतन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
त्यावेळी व्याख्यानात संदीप घोरपडे यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळातील मराठी लिखाणातील सुरुवात अर्थात पेशवाई संपुष्ट आल्या मुळे त्या वेळपर्यंत चालणाऱ्या बखरींचे लिखाण थांबले होते व इंग्रजांचा अंमल सुरू झालेला होता तो काळ शैक्षणिक दृष्ट्या खूपच अंधकारमय होता अशा संधी काळात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी एकाच पत्रकात एका बाजूला इंग्रजी व दुसऱ्या बाजूला मराठी वृत्त छापून सरकार व जनता यातील दुवा म्हणून दर्पण पत्रकाचे काम चालविले विशेष म्हणजे त्या साडेआठ वर्षात कोणतीही जाहिरात पत्रकात छापलेली नाही कोणाची मदत घेतलेली नाही सरकारी नोकरीत असूनही सरकार विरोधात निर्भीडपणे लिखाण केले त्या नजरेतून आजच्या पत्रकारांसमोरील समस्या बिकट आहेत पुरेसे मानधन नाही पत्रकारिता करण्यासाठीच्या साधनांची वाणवा व महागाईमुळे पत्रकारिता करणे पूर्वी इतके सहज राहिले नाही असे म्हणणे मांडताना पत्रकारांच्या निवृत्तीनंतरच्या सन्माननीय निवृत्तीवेतनाचा प्रश्नही मांडला यात बाळशास्त्री जांभेकर निवृत्ती सन्मान योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 35 कोटी निधी पडून आहे मात्र पत्रकारिते संबंधीच्या अटी व शर्ती अजून पूर्णत्वास जात नाहीत व अनेक निवृत्त पत्रकार या हक्काच्या मिळणाऱ्या अकरा हजार रुपयाच्या वेतनापासून वंचित आहेत
त्याचबरोबर पत्रकारितेपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले विदर्भ नेते कन्नमवार यांची गच्छंती व निधन आचार्य अत्रे यांच्या टोकदार लिखाणानेच ओढवले यासह पत्रकारितेच्या जोरावर प्रल्हाद केशव अत्रे पुणे व मुंबई नगरपालिकेत नगरसेवक तसेच महाराष्ट्र विधानसभेत 1957 व 1962 असे दोनदा आमदार म्हणून पोहोचले त्यांच्याप्रमाणेच जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे ब्रिजलाल भुता पाटील हेदेखील लोकसभेचे उमेदवार एका पत्रकाच्या आधारेच झाले होते
याचबरोबर लोकशाहीचा डोलारा सांभाळायचा असेल तर पत्रकांनी सरकारच्या ताटाखालील मांजर होऊन चालणार नाही तर समाजातील अनेक प्रश्न जे आज जटील स्वरूप घेऊन समोर आहेत त्यांच्यावर लिखाण करून समाज सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठा वाव आहे असे देखील पत्रकारांना लक्षात आणून दिले पत्रकारिता करताना लिखाणा सोबत वाचन सांस्कृतिक संपर्क समाजातील विविध घटकांच्या समस्यांची जाणीव व मोठा जनसंपर्क ज्याचे कडे असेल तो पत्रकार अधिक दूरदृष्टीचे लिखाण करू शकतो याची उदाहरण देताना गिरीश कुबेर यांच्या लिहिलेल्या संपादकीयांची आठवण करून दिली यात
आता ताई अण्णा हजारे
मोदी अँड कंपनी
ठाकरे हरले ठाकरे जिंकले
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासमोरील आव्हाने व विद्यार्थ्यांची संबंधित काळजी अशा अनेक संपादकीय लिखाणांचं आज सत्यता पूर्ण पुरते अशा व्याख्यानाने संदीप घोरपडे यांनी उपस्थित यांची मने जिंकली व पत्रकारांचा हुरूप वाढला. कार्यक्रमात संदीप घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *